मुंबई, दि. 27 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव मांडला. विधानसभेत दिवंगत सदस्यांना यावेळी सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिवंगत सदस्य पांडुरंग निवृत्ती पाटील (सडोलीकर), माजी मंत्री प्रतापराव बाबुराव भोसले, माजी राज्यमंत्री मिनाक्षी प्रभाकर पाटील, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेवराव गाडे, माजी सदस्य त्र्यंबक पांडुरंगराव कांबळे, दगडू यशवंतराव गलंडे, डॉमनिक जॉन गोन्सालवीस, विश्वास कृष्णराव गांगुर्डे, गंगाराम पोशट्टी ठक्करवाड यांच्या दुःखद निधनाबद्दल आज विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला.
दिवंगत सदस्यांच्या कार्याला यावेळी अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी उजाळा दिला. सभागृहात दोन मिनिटे मौन बाळगून दिवंगत सदस्यांना सर्व उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.