MH 13News Network
सोलापूर : श्री.म.नि.प्र. निर्विकल्प समाधीस्थ किरीटेश्वर महा शिवयोगी पुण्यस्मरण उत्सव सोहळ्यानिमित्त श्री किरटेश्वर संस्थान मठाच्या वतीने उत्तर कसबा येथील बाळवेस येथील मठात ५ ते ९ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिपती पूज्य श्री म.नि.प्र. स्वामीनाथ महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, शुक्रवार 5 एप्रिल रोजी सकाळी ९:०० वा. विरक्त मठ अक्कलकोटचे पूज्य श्री म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. दिनांक ५ ते ९ एप्रिल दरम्यान सायंकाळी ६:३० वा. धारवाड (कर्नाटक) पूज्य श्री सर्पभूषण देवरु गुरु चैतन्य आश्रम यांचे जीवन सार प्रवचन होणार आहे. ७ एप्रिल रोजी सौ कादंबरी व श्री इरण्णा मल्लय्या निम्बर्गी यांचे विशेष सत्कार होणार आहे.
तसेच ९ एप्रिल रोजी जंगम पादपूजा, महापूजा, दुपारी १२:३० वा महाप्रसाद सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी ४:३० वा उत्तर कसबा ते कुंभार वेस किरीट मठ पर्यंत पालखी महोत्सव सोहळा होणार असून पालखी सोहळ्यानंतर प्रवचन समाप्ती व समारोप समारंभ संपन्न होणार आहे.
या समारोप सोहळ्यास आलेमठ जमखंडी येथील म.नि.प्र. डॉ. चन्नबसव महास्वामीजी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत तर हुलसुर गुरु बसवेश्वर मठाचे श्री.म.नि.प्र. डॉ. शिवानंद महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार असून श्री.म.नि.प्र. मरुळसिध्द महास्वामीजी विरक्त मठ माड्याळ, श्री.म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोट, श्री.म.नि.प्र.प्रभुराज महास्वामीजी विरेश्वर शरण मठ सोलापूर, श्री.म.नि.प्र. विरंतेश्वर महास्वामीजी विरक्त मठ केसरजवळगा, श्री.म.नि.प्र. शिवानंद महास्वामीजी साईगांव, श्री.म.नि.प्र. प्रभुशांत महास्वामीजी विरक्त मठ हत्तीकणबस, श्री.म.नि.प्र. मृत्युंजय महास्वामीजी विरक्त मठ, सिद्धाश्रम, मैंदर्गी आर्दीची प्रमुख उपस्थिती लावणार आहे तरी या सोहळ्यास फक्त गणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी मठाधिपती पूज्य श्री.म.नि.प्र. स्वामीनाथ महास्वामीजी यांनी केले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरिटेश्वर भक्त मंडळ व श्री किरणेश्वर महिला मंडळ, वीरेश्वर अक्कनबळग आणि बसव केंद्राचे भक्तगण परिश्रम घेणार आहेत.