mh 13 news network
सोलापूर | प्रतिनिधी –
सोलापूरचे चार हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिश सरकारने फाशी दिली. स्वातंत्र्यलढ्यातील या महान क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ सोलापुरात हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो.
ज्यांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशी देण्यात आली; त्यांनी १९३० मध्ये सोलापूरला तीन दिवसांसाठी (९ ते ११ मे) ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र केले होते, म्हणून १२ जानेवारी हा दिवस सोलापुरात ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो .








