आचारसंहिता कालावधीत 359 गुन्ह्यात 1 कोटी पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त
MH 13 NEWS NETWORK
महाराष्ट्र दिनी असलेल्या कोरड्या दिवसाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मे रोजी जिल्हाभरात राबविलेल्या मोहिमेत 29 गुन्ह्यात सतराशे लिटर दारूसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत असून महाराष्ट्र दिनानिमित्त कोरड्या दिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत निरीक्षक अ विभाग जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सोलापूर शहरातील जोडभावी पेठ येथे मौलाली अब्दुल करीम बनकरी याच्या ताब्यातून 215 लिटर हातभट्टी दारू व घोंगडे वस्ती येथून प्रवीण पांडुरंग खैरमकोंडा याच्या ताब्यातून 140 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. तसेच दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांनी बुधवार पेठ परिसरात शेषपाल किरण सदाफुले या इसमाच्या ताब्यातून 48 लिटर देशी दारू, 56 लिटर विदेशी दारू व 66 लिटर बियर असा एकूण नव्वद हजार पाचशे दहा रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला. दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार यांच्या पथकाने दत्तनगर येथून इमरान विजापुरे याच्या ताब्यातून 150 लिटर व शनिवार पेठ येथून हैदर साहब जरतार याच्या ताब्यातून 47 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. तसेच सोलापूर विजापूर रोडवरील हॉटेल चिंतामणीच्या बाजूस मोकळ्या जागेत नागनाथ अंजप्पा म्हेत्रे या इसमाच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या इम्पेरियल ब्लू व्हिस्कीच्या विदेशी दारूच्या चौदा बाटल्या जप्त केल्या. निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव यांच्या पथकाने कुंभारी परिसरात छापा टाकून इस्माईल सय्यद याच्या ताब्यातून 50 लिटर हातभट्टी दारू व सुरेश बगले याच्या ताब्यातून साडेबारा लिटर देशी दारू व साडेतीन लिटर विदेशी दारूचा साठा जप्त केला. तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांनी कासेगाव ता. दक्षिण सोलापूर येथे नरेश पांडुरंग घाडगे याच्या धाब्यावर छापा टाकून त्याच्या ताब्यातून सव्वा दोन लिटर विदेशी दारू साठा जप्त केला.
दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने कुंभारी परिसरातून प्रकाश अमॄत उमशेट्टी याच्या ताब्यातून 40 लिटर व राजू कोळी याच्या ताब्यातून 35 लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला. दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद यांच्या पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावाचे हद्दीत भारत बाबू भोसले या इसमाच्या धाब्यावरून साडेतीन लिटर देशी दारू जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोलापूर शहर परिसरातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात परवेज अब्दुल डफेदार, सिद्धेश्वर कलप्पा दुरुगकर, तमन्ना विश्वनाथ रामपुरे, यल्लाप्पा सुहास बनसोडे, अंजनाबाई हनुमंत गायकवाड व निर्मला परमानंद जाधव तसेच सोरेगाव परिसरातून शिवानंद राजू हेबळे या इसमांना हातभट्टी दारूची विक्री करताना पकडले. या कारवाईत भरारी पथकाने 290 लिटर हातभट्टी दारूसह एकूण 32 हजार 690 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सीमा तपासणी नाका नांदणीच्या पथकाने मंद्रूप पोलीस स्टेशन हद्दीतील बरुर या ठिकाणी हॉटेल संगम या ठिकाणी छापा टाकून देशी-विदेशी दारू जप्त केली. या हॉटेलवरील नोकर जागेवरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगी या ठिकाणी छापा टाकून मीना वसंत गायकवाड या महिलेच्या ताब्यातून 14 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. याच पथकाने कुंभारी परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून पद्मा विजयकुमार दासी हीच्या ताब्यातून 42 लिटर हातभट्टी दारू व विठ्ठल रामय्या मडास याच्या ताब्यातून 110 लिटर ताडी जप्त करून गुन्हा नोंदवला. पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांनी सुगाव (भोसे) ता. पंढरपूर येथे धर्मराज अंकुश माने या इसमाला मोटरसायकलीवरून 180 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले. दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने कविटगाव ता. करमाळा येथून चिंटू भास्कर डुकले याच्या ताब्यातून सहा लिटर विदेशी दारू व 55 लिटर ताडी जप्त केली. निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांनी माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर या ठिकाणी समाधान नामदेव सुरवसे याच्या ताब्यातून पावणेसात लिटर देशी दारू व चंद्रकांत भीमराव तोरणे याच्या ताब्यातून 75 लिटर ताडी जप्त केली. दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांनी सदाशिवनगर परिसरात दत्तात्रय सुदाम देवकुळे याच्या ताब्यातून 30 लिटर हातभट्टी दारू साठा जप्त केला. एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथून मालन सदाशिव गेजगे या महिलेच्या ताब्यातून साडेसात लिटर देशी दारू जप्त केली. महाराष्ट्र दिनी राबवलेल्या विशेष मोहिमेत 29 गुन्ह्यात विभागाने एका मोटरसायकलीसह तीन लाख तेविस हजार एकशे तेहतीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 359 गुन्हे नोंदविण्यात आले असून 292 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत विभागाने अकरा हजार तिनशे पंचवीस लिटर हातभट्टी दारु, एक लाख शेहेचाळीस हजार सातशे वीस लिटर रसायन, साडे सहाशे लिटर देशी दारु, पाऊणे तिनशे लिटर विदेशी दारु, एकशे पासष्ट लिटर बीअर, सोळाशे लिटर ताडी, अडीचशे लिटर गोवा राज्याची दारु व 41 वाहने असा एकूण एक कोटी पंधरा लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.