Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत 

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सामाजिक
0
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत 
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

MH 13 NEWS NETWORK

मुंबई, दि.२८ :  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी  १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. “आई” महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले की, एमटीडीसीने महिलांसाठी समर्पित ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणले आहे. महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. २०२४ मध्ये एमटीडीसीच्या  महिला दिन विशेष सवलतीला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. १५०० हून अधिक महिला पर्यटकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, २०२५ मध्येही ही योजना राबवण्यात येणार आहे. महिला पर्यटक www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की, पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महिला पर्यटकांसाठी हा  विशेष उपक्रम आहे  एमटीडीसीची नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि खारघर (नवी मुंबई) येथील महिला-संचालित पर्यटक निवास  पूर्णतः महिलांद्वारे संचलित केली जातात. यामध्ये रिसॉर्ट व्यवस्थापन, सुरक्षा, टॅक्सी सेवा, स्वच्छता, हॉटेलिंग आदी सर्व जबाबदाऱ्या महिलांकडेच आहेत. यामुळे महिलांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

महिला पर्यटकांसाठी ३० दिवसांची विशेष सवलत

१ ते ८ मार्च २०२५ आणि वर्षभरातील इतर  २२ दिवस असे एकूण ३० दिवस ५० टक्के सवलत असून या २२ दिवसांची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार. एमटीडीसी च्या पर्यटन स्थळांवर महिला बचत गटांसाठी स्टॉल्सची सुविधा दिली जाईल. महिला पर्यटकांसाठी विशेष साहसी आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

हेरिटेज वॉक, साहसी पर्यटन, शैक्षणिक सहली आणि पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण. महिला गाइड्स आणि जल पर्यटन प्रशिक्षकांना संधी दिली जाईल. महिलांसाठी विशेष खेळ आणि मनोरंजन उपक्रम देखील असतील.

महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि अनुकूल पर्यटन – प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी स्पष्ट केले की, “महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि अनुकूल पर्यटन वातावरण निर्माण करणे हा एमटीडीसीचा मुख्य उद्देश आहे. ‘आई’ धोरणामुळे महिला प्रवाशांना अधिक संधी आणि प्रोत्साहन मिळेल.

महिलांसाठी सुरक्षित आणि आनंददायी पर्यटन अनुभव – व्यवस्थापकीय संचालक  मनोजकुमार सूर्यवंशी

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले की, ८ मार्च हा  सुट्टीचा दिवस असल्याने महिला पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडतील. त्यामुळे हा उपक्रम महिलांसाठी पर्वणी ठरेल.

महिला पर्यटकांसाठी एमटीडीसीतर्फे महिलांसाठी ही एक खास संधी आहे. सवलतीसह पर्यटनाचा आनंद नक्की घ्या. ही पर्वणी चुकवू नका! १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

राजभवन येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘माय लेकरं’ कार्यक्रम संपन्न

Next Post

व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून “आपले सरकार”च्या ५०० सेवा मिळणार

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून “आपले सरकार”च्या ५०० सेवा मिळणार

व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून “आपले सरकार”च्या ५०० सेवा मिळणार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.