MH13 News Network
‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रमातून देवेंद्र कोठेंनी सोडविल्या जनतेच्या अडचणी मतदारसंघातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार
नागरिकांनी केले कौतुक
सोलापूर : प्रतिनिधी
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी स्तुत्य पुढाकार घेत ‘आमदार आपल्या भेटीला’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी एकता नगर, कर्णिक नगर, पद्मनगर सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेत या समस्यांच्या सोडवणुकीसाठी कार्यवाही सुरू केली आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. मतदान मागण्यासाठी घरोघरी जाणारे उमेदवार निवडणुकीनंतर गायब होत असतात असा नागरिकांना अनुभव असतो. परंतु, याला छेद देत नूतन युवा आमदार देवेंद्र कोठे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी मोठे कौतुक केले आहे.
थेट भेट..!
विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताने विजयी होऊन आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देवेंद्र कोठे यांनी ‘देवयज्ञ’ हा जनता दरबार नियमितपणे भरवत नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्रारंभ केला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून देवयज्ञबरोबरच आता ‘आमदार आपल्या भेटीला’ या उपक्रमातून नागरिकांना आमदार कोठे यांना थेट भेटून विकासकामांच्या मागण्यांची निवेदने सादर करता येणार आहेत.

एकता नगर सभागृहात आयोजित या उपक्रमाप्रसंगी कर्णिक नगर भाग एक ते तीन, एकता नगर व पद्म नगर येथील नागरिकांच्या भेटी घेत भागातील महिलांच्या, ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेतल्या.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वासहतींना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या शर्तभंग, बी टू हस्तांतरण यासारखे सोसायटीचे प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द आमदार कोठे यांनी दिला.या भागातील रस्ते, ड्रेनेज, लाईट, उद्याने, त्याच सोबत परिवहन सेवेबाबतची नागरिकांची निवेदने स्वीकारली आणि प्राधान्याने विकास कामांसाठी निधी देऊन भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

श्री आदिशक्ती देवी मंदिर आणि परिसराची आमदार कोठे यांनी नागरिकांच्या सोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.याशिवाय आमदार देवेंद्र कोठे यांनी पद्मनगर क्रीडांगण येथे भेट देऊन तेथील बास्केटबॉल मैदानाची पाहणी करून संबंधित प्रशिक्षक, खेळाडूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बास्केटबॉल मैदानाच्या दुरुस्ती तसेच सुविधांसाठी निधीची पूर्तता करण्याचे व संबंधित क्रीडा अधिकाऱ्यांकडे पाठपुरवा करून कामे तात्काळ मार्गी लावण्याची तसेच वॉकिंग ट्रॅक आणि मैदानातील इतर दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली.

यानंतर क्षेत्र भेटीचा भाग म्हणून वजर्श्वेरी नगर येथे गेले असता, आमदार देवेंद्र कोठे यांनी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. विविध विषयांवर डोंगरे यांच्याशी चर्चा करून या भागातील माता-भगिनींशी देखील आमदार कोठे यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या आणि समस्यांचे निवारण लवकरात लवकर होईल असे नागरिकांना आश्वस्त केले.
‘आमदार आपल्या भेटीला’ या उपक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, रामेश्वरी बिर्रु, गुरुशांत धुत्तरगांवकर, भाजपा शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी उपस्थित होते.
तसेच या भागातील नागेश सरगम, सुरेश चिक्काळी, दत्तात्रय पोसा, भीमाशंकर जवळे, धनराज जानकर, बंटी क्षीरसागर, एकता नगर सोसायटी चेअरमन विष्णू माने, सचिव हेणे,अंबादास इंदापुरे, शशिकला कस्पटे, रमेश माने, नंदकुमार बंडगर, अजय कुलकर्णी, कर्णिक नगर सोसायटी चेअरमन धावरू राठोड, तुळशीदास जाधव, राजा जोशी,जोगधनकर, पद्मनगर सोसायटीचे ॲड.श्रीनिवास क्यातम, लक्ष्मीनारायण कुचन,श्रीनिवास दिड्डी, अनिल देसाई, राहुल उपाध्ये, सुनील देसाई,ज्ञानेश्वर गवते, शिवा संगा, प्रभाकर यादगिरी, श्रीशैल शेळे, काशिनाथ मोगली, प्रसन्न जवंजाळ, नामदेव जवंजाळ, राजेश चौरे, रामचंद्र गवते, नरेंद्र मिसालुल तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काचा सुद्धा खाली न करणारा नगरसेवक..!
राजकीय नेत्यांविषयी जनसामान्यांमध्ये विविध भावना असतात. निवडून आल्यावर गाडीच्या काचा सुद्धा खाली न करणारा नगरसेवक सोलापूरच्या जनतेने पाहिला आहे. परंतु प्रचंड मताने विजयी होऊन सुद्धा नम्र असणारा आमदार आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. आमदारांची सहजतेने प्रत्यक्ष भेट होऊन आमच्या समस्या त्यांनी किमान ऐकाव्यात अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना असते. आज आमच्या महिला भगिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमचा हक्काचा दादा आला असेच आम्हाला वाटत होते.
एक महिला नागरिक..
जसे शासन आपल्या दारी उपक्रम ; तसाच आपला आमदार आपल्या भेटीला..!
हा उपक्रम नियमित सुरू राहणार असून माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या परिसरात जाऊन त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या सोडवण्यावर माझा भर असणार आहे. मत मागण्यासाठी आम्ही मतदारांच्या भेटीला जात होतो. त्यांनी मतांच्या रूपाने मोठा आशीर्वाद दिला आहे.
त्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष भेट देणे हे माझे कर्तव्यच..!
देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य | Devendra Kothe MLA