Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दहावीच्या उर्वरित पेपर साठी कॉपी होणार नाही यासाठी दक्षता

MH 13 News by MH 13 News
12 months ago
in महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
दहावीच्या उर्वरित पेपर साठी कॉपी होणार नाही यासाठी दक्षता
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मास कॉपी होणाऱ्या परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालकावर व पर्यवेक्षकांवर कठोर कारवाई करावी
*सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांनी त्या त्या तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र तसेच कॉपीबाबत तक्रार येणाऱ्या परीक्षा केंद्रावर अधिक लक्ष ठेवावे
*जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील 184 परीक्षा केंद्रावर 65,585 विद्यार्थी दहावीच्या परीक्षा देत आहेत
*कॉपी, गर्दी व अन्य कारणासाठी जिल्ह्यातील 76 परीक्षा केंद्र संवेदनशील
*5 मार्च गणित भाग 1, 7 मार्च गणित भाग 2, 10 मार्च विज्ञान भाग 1 व 12 मार्च विज्ञान भाग 2 असे चार पेपर बाकी

सोलापूर, दिनांक 4(जिमाका):- सध्या दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा सुरू असून बारावीचा एक तर दहावीचे चार पेपर राहिले आहेत. तरी दहावी व बारावीच्या उर्वरित पेपर साठी एकाही परीक्षा केंद्रावर मास कॉपी अथवा अन्य कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार आणि गटशिक्षण अधिकारी यांनी अत्यंत दक्ष राहून परीक्षा सुरळीत पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
दहावी व बारावी बोर्ड परीक्षेच्या उर्वरित पेपर साठी कॉपी होऊ नये यासाठी दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की दहावी बारावी परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक पत्रकार व मान्यवर व्यक्तीकडून काही परीक्षा केंद्रावर कॉपी व अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने त्या तक्रारीचे तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आलेले आहे त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणेने विशेषत: शिक्षण विभागाने दहावी-बारावी च्या उर्वरित पेपर साठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून संवेदनशील परीक्षा केंद्राबरोबरच अन्य परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तरीही परीक्षा केंद्रावर कॉपी होत असल्याचे आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यास जागेवरच निलंबित करावे तर संबंधित परीक्षा केंद्र चालकावर गुन्हे दाखल करून ते केंद्र पुढील कोणत्याही परीक्षेसाठीचे बंदी आदेश काढावेत, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

प्रत्येक उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्या त्या तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र तसेच कॉपीच्या तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्र चालकांना बोलावून त्यांच्या केंद्रावर उर्वरित पेपरसाठी कॉपी होणार नाही याबाबत अत्यंत कठोरपणे निर्देश द्यावेत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी माळशिरस यांनी शिरपूर येथील परीक्षा केंद्रावर भेट देऊन तेथे कॉपी होत असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले होते, त्या केंद्रावरील पर्यवेक्षक तसेच केंद्र चालकावर त्वरित कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कंट्रोल रूमच्या माध्यमातून कॉपी करणाऱ्या केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सांगोला, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील काही शाळावर कॉपी होत असल्याच्या तक्रारी आलेल्या असून त्याबाबत तपासणी करून पुढील कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दहावी बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील संवेदनशील केंद्र तसेच कॉपी होत असल्याच्या आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांना माहिती देऊन संबंधित केंद्रावर अधिक भरारी पथके तसेच बैठे पथकांची नियुक्ती करण्याबाबत सूचित केले. तसेच पोलीस विभागांनी परीक्षा केंद्र परिसरात 1000 मीटर पर्यंत जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे त्याचे अत्यंत कठोर अंमलबजावणी करण्याबाबत सूचित केले.
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 184 परीक्षा केंद्रावर दहावी व बारावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू असून 76 परीक्षा केंद्र संवेदनशील असल्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप यांनी सांगितले. दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी जिल्ह्यातील 65 हजार 585 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बारावीचा माहिती तंत्रज्ञान पेपर बाकी असून दहावीचे गणित भाग एक व दोन व विज्ञान भाग एक व दोन असे चार पेपर बाकी असून या सर्व पेपर साठी अत्यंत दक्षपणे कार्यवाही करून परीक्षा सुरळीतपणे पार पाडली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच मास कॉपी करणाऱ्या व परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्या परीक्षा केंद्रावर तसेच केंद्र चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल तर संबंधित पर्यवेक्षक यांना जागेवरच निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील नांदुरे येथील स्टार इंग्लिश स्कूलमध्ये तहसीलदार यांनी तपासणी केली असता फळ्यावर प्रश्नांची उत्तरे लिहून दिली जात असल्याचे निर्देशनास आल्यानंतर संबंधित पर्यवेक्षक अमोल पवार व श्रीमती निपारे यांना त्याच दिवशी निलंबित करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

Previous Post

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार

Next Post

विधानभवनाच्या पायऱ्यावर अबू आझमी यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
विधानभवनाच्या पायऱ्यावर अबू आझमी यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यावर अबू आझमी यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.