Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यास देणार प्राधान्य – भाजप उमेदवार सातपुते

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी घेतली टेक्सटाईल उद्योजकांची भेट


सोलापुरातील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यास निश्चित प्राधान्य देऊ, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिले. भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी गुरूवारी अक्कलकोट रोड एमआयडीसीतील उद्योजकांच्या भेटी घेतल्या.



यावेळी उद्योजक श्रीनिवास दायमा आणि प्रमोद दरगड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेले टॉवेल देऊन आमदार राम सातपुते यांचा सन्मान केला. याप्रसंगी उद्योजकांनी अक्कलकोट रोड एमआयडीसीतील अडचणी सांगितल्या. १९९६ नंतर या औद्योगीक वसाहतीत रस्ते झालेले नाहीत. सोलापूरच्या उद्योगासाठी १६ एमएलडी पाण्याची तरतूद आहे. यातील सात एमएलडी पाणी चिंचोळी एमआयडीसीला मिळते मात्र ,अक्कलकोट रोड एमआयडीसीला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. परिणामी, पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच वीजपुरवठाबाबतही उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यावर आमदार सातपुते यांनी उद्योजकांना विस्तृत नियोजन आराखडा तयार करण्यास सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक लावून उद्योजकांच्या सर्व अडचणी सोडवू. त्याचबरोबर दर दोन महिन्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लघुउद्योजकांची लावून त्यांच्या अडचणी सोडविणार असल्याचेही भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, उद्योजक आणि भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, श्रीनिवास दुबास, सदानंद कोडम, प्रमोद दरगड, सुनिल सारडा, गोविंद दायमा, अमित मादगुंडी, बालाजी बुरा,  अंबादास बिंगी, निलेश फोफलिया, गिरीश फोफलिया, इंदिरा कुडक्याल आदी उपस्थित होते.

कामगार वर्गाचा भरघोस पाठिंबा

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कामगार वर्गाने भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना लोकसभा निवडणुकीसाठी भरघोस पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. आमदार राम सातपुते यांची सोलापूरच्या सर्वांगीण विकासाची भूमिका कामगार वर्गाला पटली असून सोलापुरातील संपूर्ण कष्टकरी वर्ग आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे कामगारांनी याप्रसंगी सांगितले.

Tags: BJP MaharashtraNarendra ModiRam satpute BjpSolapur Loksabha election
Previous Post

भाजप उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारासाठी ‘मास्तर’ मैदानात.!

Next Post

शहर मध्य मधून एक लाखाचा लीड देणार – मनीष काळजे,शिवसेना जिल्हाप्रमुख

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
शहर मध्य मधून एक लाखाचा लीड देणार – मनीष काळजे,शिवसेना जिल्हाप्रमुख

शहर मध्य मधून एक लाखाचा लीड देणार - मनीष काळजे,शिवसेना जिल्हाप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.