शिवसेना जिल्हा प्रमुख मनिष काळजे : महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची शिवसेना कार्यालयास भेट
सोलापूर / प्रतिनिधी
सुशीलकुमार शिंदे यांच्या घराण्यातील तिसऱ्या व्यक्तीचा पराभव करण्यासाठी शिवसेना सज्ज असून शहर मध्य मधून एक लाख मतांचा लीड देणार असल्याचं शिवसैनिकांनी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी केले. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्या कार्यालयास भेट देऊन चर्चा केली.
शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे म्हणाले, शहर मध्य मधून एक लाखाचा लीड देऊ. महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने निवडुन देऊ. ते आपले भावी खासदार आहेत असा राम सातपुते यांचा उल्लेख मनीष काळजे यांनी या बैठकी दरम्यान केला.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मान राखून काम करणारा कट्टर नेता म्हणून मनीष काळजे आम्हाला परिचित आहेत. त्यांच्याबद्दल नेहमी मुंबईत ऐकायला मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महायुतीचे ४५ खासदार निवडून आढळण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे हे ध्येय गाठण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावे, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे – पाटील, महिला जिल्हाप्रमुख कोमल करपे, उपजिल्हाप्रमुख ब्रम्हदेव गायकवाड,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख, युवासेना तालुकाप्रमुख अतिश गवळी, विद्यार्थी सेनेचे ऋषी घोलप, आकाश मुदगल, लोधी समाज अध्यक्ष सुमित मनसावाले, मोची समाज अध्यक्ष विजय मेत्रे, सोशल मिडिया जिल्हाप्रमुख आशिष जेटीथोर, चर्मकार समाजाचे युवक अध्यक्ष राजेंद्र कांबळे व बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.