Sunday, October 12, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ | भर बैठकीत विषय मांडताच आयुक्तांनी दिले ऑडिटिंगचे आदेश.!

MH13 News by MH13 News
5 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ | भर बैठकीत विषय मांडताच आयुक्तांनी दिले ऑडिटिंगचे आदेश.!
0
SHARES
252
VIEWS
ShareShareShare

MH 13 News network

सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी महापालिकेच्या आणि शासनाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. परंतु ते तकलादू पद्धतीचे झाले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ॲड.योगेश पवार यांनी महापालिका आयुक्तांनी बोलवलेल्या बैठकीत देताच आयुक्तांनी या परिसराचे थर्ड पार्टी ऑडिटिंग करण्याचे आदेश दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम काही महिन्यापासून प्रलंबित आहे. यामुळे शिवभक्तांच्या भावना या संतप्त झाल्या आहेत. त्यासोबत छत्रपती संभाजी महाराज चौकातील सुशोभीकरण हे दर्जाहीन असल्याचे अनेक शिवभक्तांचे म्हणणे होते.

याबाबत भावना जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती.

या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त आशिष लोकरे, यांच्यासह संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी, झोन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याचे काम अतिशय संथ गतीने असल्याचे मनपाच्या निदर्शनाला आले असून त्याचे नेमके काम कशामुळे रेंगाळले..? याची माहिती प्रोजेक्टरवर मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आली.

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला कोणताही डिफेक्ट नाही. याची माहिती देताना सर्व प्रकारच्या तांत्रिक चाचण्या केल्या असल्याचे सांगण्यात आले. चबुतराच्या स्लॅब बाबत दुरुस्ती करण्याचे काम वेगाने हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

सोमवारी 28 एप्रिल रोजी दुपारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, मध्यवर्ती महामंडळाचे पुरुषोत्तम बरडे यांनी छत्रपती संभाजी महाराज चौकात अतिशय तकलादु पद्धतीचे,निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे निदर्शनाला आणले. बांबूच्या कामट्या, बंद असणारे कारंजे, एनकॅपद्वारे केलेले पर्यावरणाशी निगडित असणारे सुशोभीकरण, या ठिकाणी लावण्यात आलेली पामची झाडे, विद्युत रोषणाई, आणि या जवळ करण्यात आलेले वरून पाण्याचा झोत टाकणारे कारंजे यावर ताशेरे ओढले.

छावा संघटनेचे नेते, ॲड. योगेश पवार यांनी महापालिका आयुक्तांनी आमच्या भावना जाणून घेतल्याबद्दल आभार मानले. त्याचसोबत छत्रपती संभाजी महाराज चौकातील पुतळा परिसरातील सुशोभीकरण बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. भविष्यात या ठिकाणी पडझड होऊ शकते. याला जबाबदार कोण..? येथील असणारे स्मारक हे कोणा एकाची जहागिरी नाही. प्रशासनाने तातडीने पावले उचलावी. अन्यथा भविष्यात शिवभक्तांचा मोठा रोष प्रशासनाला भोगावा लागेल असेही त्यांनी सांगितले.

यावर तातडीने महापालिका आयुक्तांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील सुशोभीकरणाचे थर्ड पार्टी ऑडिटिंग करण्याच्या सूचना दिल्या.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती नंतर म्हणजेच 14 मे नंतर या संदर्भात पुढील सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या भागातील कामाची माहिती घेणार असल्याचे आश्वासन सर्व पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे माजी उपमहापौर पद्माकर काळे, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, श्रीकांत घाडगे, माऊली पवार, रवी मोहिते, माजी नगरसेवक अनंत जाधव, माजी अध्यक्ष पवार, उत्सवा अध्यक्ष सुशील बंदपट्टे, रवी मोहिते, सोमनाथ राऊत, दिनकर जगदाळे, प्रताप चव्हाण,मतीन बागवान,प्रकाश ननवरे, पुकाळे, शेखर फंड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते,शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

सोलापूर गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई | दोन आंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद; लाखांचा मुद्देमाल जप्त..

Next Post

इंदापूरजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, दोन महिलांसह एक मुलगी जखमी..

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
इंदापूरजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, दोन महिलांसह एक मुलगी जखमी..

इंदापूरजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, दोन महिलांसह एक मुलगी जखमी..

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.