Saturday, July 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ

MH13 News by MH13 News
1 year ago
in आरोग्य, कृषी, सामाजिक
0
दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ
0
SHARES
21
VIEWS
ShareShareShare

“दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा” — शिष्यपाल सेठी यांची बीबीदारफळ जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याची सूचना

सोलापूर – “गाव पातळीवरील पाणी व स्वच्छता समिती बळकट करा, कामांचा दर्जा राखा आणि लोकांपर्यंत योजनेचा लाभ पोचवा”, असे आवाहन केंद्र शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाल सेठी यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील बीबीदारफळ येथे पाहणीदरम्यान केले.

जिल्हा परिषद कार्यालयात झालेल्या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी स्वागत करून जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा दिला. निधीअभावी काही कामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ग्रामपंचायतीत थेट संवाद – प्रत्यक्ष पाहणी

शिष्यपाल सेठी यांनी बीबीदारफळ ग्रामपंचायतीस भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. सरपंच अर्चना ननवरे व उपसरपंच नारायण सर्वगोड यांच्या उपस्थितीत गावातील विहीर, टाकी, पाईपलाईन, तसेच सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची पाहणी करण्यात आली.

तलाव ते नळ कनेक्शन – पायी चालत सखोल पाहणी..!

विशेष म्हणजे, शिष्यपाल सेठी यांनी बीबीदारफळ तलावातून अकोलेकाटी ग्रामपंचायतीपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेची दीड किलोमीटर अंतर पायी चालत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी विहिरीतील पाणीपातळी, नळ कनेक्शनद्वारे येणारा पाण्याचा दाब, व महिला सदस्यांकडून पाण्याचे नमुने तपासले.

दुष्काळी परिस्थितीत बदलते स्त्रोत..

उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी इंग्रजी व हिंदी भाषेत सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर सतत बदलणाऱ्या जलस्रोतांची माहिती दिली. वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी पाण्याची मागणी याकडेही लक्ष वेधले.

कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सर्व कामांचे सादरीकरण केले. बीआरसी मोनिका दिनकर, आम्रपाली गजघाटे यांनी पाणी व स्वच्छता समितीची माहिती दिली, तर सोनाली कुलकर्णी यांनी पाणी गुणवत्तेवर सविस्तर माहिती दिली.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

खानदानी दुश्मनीतून दुहेरी खून प्रकरणी ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना हायकोर्टातून जामीन..

Next Post

शुक्रवारी अक्कलकोट बंद.! प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध..

Related Posts

Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
कृषी

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

1 July 2026
शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
Next Post
शुक्रवारी अक्कलकोट बंद.! प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध..

शुक्रवारी अक्कलकोट बंद.! प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.