Monday, October 13, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक
0
मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

mh 13news network

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा

मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ व चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ तसेच ६० आणि ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा वरळी येथे एसव्हीपी स्टेडियम, डोम येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी रंगभूमी ही जगातील सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे. छोटा पडदा, मोठा पडदा, ओटीटी प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांत मराठी कलावंतांनी अप्रतिम योगदान दिले आहे. केवळ कलावंतच नाही तर पडद्यामागे काम करणाऱ्या सर्वांचा मनापासून गौरव व्हावा, हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अनुपम खेर यांच्या बहुप्रतिभावान अभिनयाचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पहिल्याच चित्रपटात 70 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारणारे खेर आजही तितक्याच उत्साहाने अभिनय करत आहेत.”

मुक्ता बर्वे यांच्या 360 अंश अभिनय क्षमतेचा, विशेषतः ‘चार चौघी’ मधील त्यांच्या मोनोलॉगचा, तसेच महेश मांजरेकर यांच्या दमदार अभिनय आणि दिग्दर्शनाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव केला. गझलकार भीमराव पांचाळे यांचा उल्लेख करताना श्री फडणवीस म्हणाले, “सुरेश भट आणि भीमराव पांचाळे यांची जोडी मराठी गझलांना अविस्मरणीय उंचीवर घेऊन गेली.”

“शिवाजी महाराजांच्या नावाने जागतिक वारसा मिळविणे हे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचे क्षण आहे,” असं ते म्हणाले.

“मराठी चित्रपटसृष्टी आमचं वैभव आहे आणि ती भविष्यात अधिक समृद्ध होईल, असा मला विश्वास आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबईत कुठेही चित्रीकरणासाठी नि:शुल्क परवानगी
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबईतील कोणत्याही लोकेशनवर चित्रीकरणासाठी परवानगी आता नि:शुल्क दिली जाणार आहे. तसेच राज्यातील विविध चित्रपट निर्मिती स्थळांवर सुलभ दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

मराठी चित्रपटांचे जागतिक पातळीवर प्रमोशन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘एफएम’ रेडिओवर मराठी गाणे व कार्यक्रमांसाठी ठराविक वेळ देण्याबाबत एफएम रेडिओ चॅनेल्सशी चर्चा केली असून त्यासाठी पुरस्कार योजना देखील जाहीर केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अमेरिका दौऱ्यात नेटफ्लिक्सच्या लॉस एंजेलिस येथील मुख्यालयात मराठी चित्रपटांना स्थान देण्याची मागणी केल्याचेही श्री शेलार यांनी सांगितले. “मराठी सिनेमा, चित्रपटगृहे आणि निर्मात्यांना हक्काचे स्थान मिळावे, यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने काम करत असल्याचे सांगितले.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते गजलगायक भीमराव पांचाळे यांना “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पद्मश्री काजोल देवगण यांना स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024, पद्मभूषण अनुपम खेर यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024, अनिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 आणि निर्माते महेश मांजरेकर यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेला “छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025” हा युनेस्कोतील भारताचे कायस्वरूपी प्रतिनिधी राजदूत विशाल शर्मा यांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, दुर्ग अभ्यासक माधव फडके यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी 60 आणि 61 व्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार, कलारसिक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी हीरक महोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणसंग्राम.!मनोज जरांगे पाटील येणार सोलापुरात..

Next Post

उत्तराखंडातील ढगफुटी हादरवते, पण महाराष्ट्राचे ५१ पर्यटक वाचले

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
उत्तराखंडातील ढगफुटी हादरवते, पण महाराष्ट्राचे ५१ पर्यटक वाचले

उत्तराखंडातील ढगफुटी हादरवते, पण महाराष्ट्राचे ५१ पर्यटक वाचले

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.