Sunday, May 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मतदानासाठी मिळणार भरपगारी सुटी, सवलत..! वाचा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
मतदानासाठी मिळणार भरपगारी सुटी, सवलत..! वाचा
0
SHARES
43
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यात 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुट्टी किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य सवलत देण्यात येणार आहे. मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा व सवलतीचा फायदा घेऊन अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 135 (ब) नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सु्ट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडील 22 मार्च 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी /कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणूकीच्या दिवशी त्यांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात येणार आहे.

मतदानाच्या दिवशी देण्यात येणारी सुटी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यांना लागू असणार आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पुर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल, मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

या परिपत्रकानुसार उद्योग विभागांतर्गंत येणारे सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी परिपत्रकातील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावयाची आहे.

मतदारांना मतदानाकरिता योग्य ती सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता न येणे शक्य झाले नाही, अशी तक्रार आल्यास संबंधितांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे सदर परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

०००

Tags: Loksabha election
Previous Post

आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना..!

Next Post

राज्य शासनाचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
राज्य शासनाचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

राज्य शासनाचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.