MH 13 NEWS NETWORK
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त; १ आयुक्त, ३ DCP, SRPF कंपनीसह मोठा फौजफाटा सज्ज
दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस विभागाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या मिरवणुकीत शिस्त आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी खालील प्रमाणे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे:
🔹 १ पोलीस आयुक्त,
🔹 ३ पोलीस उपायुक्त,
🔹 ७ सहाय्यक पोलीस आयुक्त,
🔹 २५ पोलीस निरीक्षक,
🔹 १०० उपनिरीक्षक / सहाय्यक पोलीस निरीक्षक,
🔹 १३५८ पोलीस अंमलदार,
🔹 ५०० होमगार्ड,
🔹 SRPF ची १ कंपनी
या बंदोबस्तासाठी इतर विभागांतूनही अतिरिक्त मनुष्यबळ मागवण्यात आले आहे, ज्यामध्ये:
▪️ १ उपअधीक्षक (DySP)
▪️ २५ प्रशिक्षणार्थी पोसई
▪️ २५ पोलीस अंमलदार
▪️ ५०० होमगार्ड
▪️ SRPF ची १ कंपनी
या फौजफाट्याच्या मदतीने विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. गर्दीच्या नियंत्रणासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही यंत्रणा, ड्रोन कॅमेरे आणि नियंत्रण कक्षाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे, तसेच कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित नजिकच्या पोलीस स्थानकाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.