MH 13 NEWS NETWORK
सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात उद्या सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणार आहे. लवकरात लवकर विसर्जन पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रध्दानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपतीचे ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विसर्जन वेळेत होण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळात सहभागी होणाऱ्या सर्व उत्सव मंडळांनी वेळेवर मिरवणुकीस सुरुवात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेस ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंडके, सचिव अनिल सावंत, खजिनदार चंद्रशेखर कळमणकर, गुरुनाथ निंबाळे, राहुल कुमने, किरण अक्कलकोटे, केदार वनारोटे, शिवानंद सावळगी, अनिल नंदीमठ आदी मान्यवर उपस्थित होते.