MH 13 NEWS NETWORK
गणेशोत्सव ” काळात प्रशालेच्यावतीने विविध उपक्रम

ज्ञान, समृद्धी व बुद्धीची देवता असलेल्या श्री गणरायाची “गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत” चालणारा हा उत्सव एक चैतन्यमय आणि आनंदाचा उत्सव आहे. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक परंपरांची ओळख व्हावी, सामुहिक कार्य करण्याची शिकवण मिळावी यासाठी शाळेतही गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. याच अनुषंगाने महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे हा “गणेशोत्सव ” प्रतिवर्षी विविध उपक्रमांने साजरा केला जातो.यंदाही “अथर्वशीर्ष “पठन, ‘अष्टविनायकाचे वैशिष्ट्य व महत्त्व कथन ‘करण्यासोबतच समुहगीत गायन व चित्ररंगभरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व विद्यार्थ्यांना ” नरसिंह ” हा चित्रपट ही दाखवण्यात आला. शेवटी नवव्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या श्री. गणेशाच्या विविध भक्तीगीतावर आधारित वैयक्तिकनृत्य, समुहनृत्यांने तसेच लेझीम नृत्याने रस्त्याच्या दुतर्फ्यावरती थांबून पाहणाऱ्या पालकांचे, गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले अशारितीने टाळमृदंगाच्या गजरात, लेझीमच्या तालात व हलगीच्या निनादात ” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ” अशा जयघोषात प्रशालेच्या बाप्पाला निरोप देण्यात आला.
हा “गणेशोत्सव ” साजरा करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अप्पासाहेब काळे, सहाय्यिका सौ. मल्लम्मा चपळगाव मॅडम, कलाशिक्षक राजेंद्र यंदे, धनंजय जोजन, शशिकांत अंकलगे, अब्दुलअझीझ मुल्ला, प्रा. रवींद्र कालीबत्ते, प्रा. काशीनाथ पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रशालेतील वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रमांबद्दल संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. श्री. सचिन कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मा. श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ मा. श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते मा. श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती, सी. ई. ओ. सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अशोक साखरे,पर्यवेक्षक श्री.ज्ञानदेव शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.