मराठ्यांनंतर सोलापुरात बंजारा समाजाची आरक्षणासाठी भव्य एकजूट! – १६ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर दणदणीत मोर्चा
👉 बैठकीत काय घडलं आणि किती मोठा मोर्चा निघणार आहे,
वाचा सविस्तर
बंजारा समाजाचे आरक्षण आंदोलन उफाळले!
देशभरात सुमारे १५ कोटी लोकसंख्या असलेला बंजारा समाज विविध राज्यांत वास्तव्याला आहे. काही राज्यांमध्ये या समाजाला अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळते; मात्र महाराष्ट्रात फक्त विमुक्त जातीचे आरक्षण आहे. त्यामुळे राज्यभर ‘हैदराबाद गॅझेट’च्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामावून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ठाण्यापासून मुंबईपर्यंतची चळवळ –
आता सोलापूरकडे मोर्चाबंजारा समाजाच्या मागणीसाठी पहिली बैठक ठाण्यातील बेलापूर येथे झाली. त्यानंतर मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत मुंबईत दुसरी बैठक पार पडली आणि यावेळी “महाराष्ट्र राज्य बंजारा एसटी आरक्षण कृती समिती” स्थापन झाली.आता या आंदोलनाची धग सोलापूरपर्यंत पोहोचली असून, १० सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे भव्य बैठक घेण्यात आली
मोर्चाचा बिगुल – १६ सप्टेंबर ठरला निर्णायक दिवस!

या बैठकीत एकमुखाने ठरवण्यात आले की, मंगळवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल.
मोर्चाची सुरुवात नेहरूनगर येथील संत सेवालाल चौकातून होणार असून, दलित मित्र चंद्राम चव्हाण गुरुजी व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अशोकनगर – जुना विजापूर नाका – छत्रपती संभाजी महाराज तलाव – पत्रकार भवन मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार आहे.
मोर्चात १० ते १५ हजारांचा जनसागर.!
कृती समितीच्या नियोजनानुसार या मोर्चामध्ये किमान १० ते १५ हजार बंजारा बांधव आणि भगिनी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, बंजारा भगिनी या आपल्या पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने मोर्चात उतरतील
📢 तांडा ते तांडा – आवाहनाची रणधुमाळी!
मोर्चात जास्तीत जास्त बांधव सहभागी व्हावेत म्हणून प्रमुख समन्वयकांनी प्रत्येक तांड्यात सभा, बैठक, गृहभेट आणि संवादाचे नियोजन केले आहे. “आरक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही, त्यामुळे १६ सप्टेंबरचा मोर्चा हा ऐतिहासिक ठरणार,” असा निर्धार समन्वयकांनी व्यक्त केला.
शेवटी काय होणार?..
जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर सकल बंजारा समाजाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करेल आणि तेथून या भव्य मोर्चाची सांगता होईल.
सोलापुरातील हा मोर्चा फक्त सुरुवात आहे की निर्णायक टप्पा? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.