सोलापूर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची बदली..
पुणे महापालिकेत उपायुक्त म्हणून नियुक्ती!
सोलापूर :
सोलापूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असणारे रवी पवार यांची बदली पुणे महापालिकेत करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव पुणे महापालिकेत रिक्त असलेल्या उपायुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून यासंदर्भातील शासन आदेश मंत्रालयातून आज, सोमवार १५ सप्टेंबर रोजी जारी झाला आहे.
पवार यांनी सोलापूर महापालिकेत काम करताना अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. विशेषतः शहरातील स्वच्छता मोहिम, कचरा व्यवस्थापन व नागरी सुविधा सुधारणा यामध्ये त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली होती. लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची छाप उमटवली होती.
दरम्यान, पुणेकरांसाठी आता पवार यांचा अनुभव आणि काम करण्याची पद्धत महत्त्वाची ठरणार आहे. सोलापुरात त्यांच्या बदलीची बातमी समजताच अनेक नागरिक व सहकारी अधिकाऱ्यांकडून खंत व्यक्त होत आहे.