MH 13 News Network
सोलापूर /माढा
विवाहितेवर सामूहिक दुष्कर्म केल्याप्रकरणी माढा येथील एका आरोपीस कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.ही घटना 19 मे 2025 रोजी घडली होती.
फिर्यादी विवाहितेला “तुमचे पती सोलापूरला गेले आहेत, तेथे काम आहे” असे सांगून आरोपी व त्याच्या साथीदाराने गाडीत बसवले. त्यानंतर गावाजवळील जंगलात नेऊन तिच्यावर आळीपाळीने दुष्कर्म करण्यात आले असल्याची फिर्याद देण्यात आली होती.
सदर पीडितेने 28 मे 2025 रोजी सोलापुरातील माढा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून आरोपीने बार्शी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता; मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर ॲड. रितेश थोबडे यांच्या मार्फत आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
असा होता युक्तिवाद…
न्यायालयीन सुनावणीदरम्यान ॲड. थोबडे यांनी, “फिर्यादीने तक्रार विलंबाने दाखल केली असून, तिच्या पतीविरुद्ध या प्रकरणातील सहआरोपीने आधीच गुन्हा दाखल केला होता,” असा युक्तिवाद केला.
तो ग्राह्य धरून न्यायालयाने अर्जदारास 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.सरकारतर्फे ॲड. पी. एस. राणे यांनी काम पाहिले.