MH 13 News network
सोलापूर (प्रतिनिधी) :अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरस्थितीत गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करत पूज्य संत श्री आशारामजी बापू आश्रम संचालित श्री योग वेदान्त सेवा समिती व महिला उत्थान मंडळ, साधक-साधिका सोलापूर यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

शिवनी, तिर्हे व शिरापूर या गावांमध्ये राबवलेल्या या मदतकार्यामध्ये सुमारे ३५० कुटुंबांना किट्स वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला बरमोडा, टॉवेल, साडी, शर्ट, बिस्किटे, चिवडा (२५० ग्रॅम) तसेच सत्साहित्य देण्यात आले.फक्त वस्तुरूप मदतीवरच मर्यादित न राहता पूरग्रस्त नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी भगवंत नाम संकीर्तनही घेण्यात आले.

त्यामुळे वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली.या उपक्रमामुळे पूरग्रस्तांना तात्पुरता दिलासा मिळाला असून “समाजातील गरजूंसाठी कार्य करणे हीच खरी सेवा” असा संदेश संस्थेच्या वतीने देण्यात आला.