MH 13 NEWS NETWORK
सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मानकरींचा सन्मान
सोलापूरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेल्या परंपरेनुसार मानाचे तेली समाजाच्या वतीने श्री अंबाबाई श्री जगदंबा माता या देवस्थानाच्या वतीने
श्री क्षेत्र तुळजापूर येथील आश्विन (कोजागिरी) पौर्णिमा या पवित्र दिवशी होणाऱ्या छबिना या धार्मिक विधीत सहभागी होण्यासाठी
तेली समाजाच्या वतीने काठ्या पालखी आज संध्याकाळी सहा वाजता शुक्रवार पेठेतुन प्रस्थान करण्यात आले.
प्रारंभी दोन्ही देवस्थानाची समाजाची कुलस्वामिनी अंबाबाई जगदंबा मातेच्या मुर्तीची पुजा करण्यात आली
पालखीतील असलेल्या उत्सव मुर्तीची पुजा करुन आरती करण्यात आली यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या धर्मपत्नी सौ.शांभवी सचिन कल्याणशेट्टी व माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने
उत्सव अध्यक्ष श्री ब्रम्हदेव गायकवाड सचिव दत्तात्रय मेनकुदळे,विजय पुकाळे,शिवानंद येरटे यांची उपस्थिती होते.
श्री जगदंबा श्री अंबाबाई या देवस्थानाच्या श्री क्षेत्र तुळजापूर येथे पौर्णिमा निमित पायी जाणाऱ्या मानकरींचा सन्मान करुन
महाराष्ट्रातील व देशातील आलेल्या अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधार द्या
आलेल संकट दूर करावा शासनाने सर्वोपरी मदत त्वरित करावी अशी साकडं श्री तुळजाभवानी मातेच्या छबिनासाठी निघालेल्या या मानाच्या
देवीच्या चरणी सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.