mh 13 news network
पुणे — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी मोठ्या ताकदीने लढा देण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री व सोलापूर शहर जिल्ह्याचे संपर्कमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत सोलापूर शहराची भौगोलिक परिस्थिती, महानगरपालिकेतील सदस्यसंख्या, मागील निवडणुकांतील सर्वपक्षीय स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. भरणे यांनी पदाधिकारी, फ्रंटल सेल अध्यक्ष व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटन मजबूत करण्याचे आणि नव्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मानाने सामावून घेण्याचे निर्देश दिले.
बैठकीदरम्यान जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून पक्ष अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले की, “उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व संपर्कमंत्री दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर महानगरपालिकेतील निवडणुकीसाठी आम्ही सर्व पदाधिकारी एकजुटीने काम करून पक्षाचे अधिकाधिक सदस्य निवडून आणू.”
या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, नगरसेवक तौफिक शेख, गणेश पुजारी, प्रदेश सचिव इरफान शेख तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते








