mh 13 news network
सोलापूर /प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्तांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा आशेचा दीप लावण्यासाठी श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान पुढे सरसावली आहे.

पूरग्रस्तांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, यासाठी माजी आमदार श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानकडून १००० दिवाळी साहित्य किट वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.
रविवारी हत्तूर, वडगबाळ आणि व्हनमुर्गी येथील ग्रामस्थांना या दिवाळी किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य देण्यात आले असून पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने केला आहे.
या प्रसंगी बोलताना राजशेखर शिवदारे म्हणाले,
“सीना नदीकाठावरील पंधरा गावांना पुराच्या पाण्याचा विळखा बसला होता. अनेकांच्या घरात, शेतात पुराचे पाणी गेल्यामुळे संसारपयोगी साहित्य वाहून गेले. खरीप आणि बागायत पिकांचे नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी आमचे प्रतिष्ठान पुढे आले आहे.
चार दिवसांवर दिवाळीचा सण आहे, पण अनेक कुटुंबे अजूनही पुराच्या धक्क्यातून सावरलेली नाहीत. त्यांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, यासाठी जीवनावश्यक वस्तू आणि फराळ साहित्य देत आहोत. आमचे प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आले आहे आणि ही संवेदना आम्ही पुढेही जपणार आहोत.”
यावेळी प्रतिष्ठानचे संचालक तथा माजी सभापती डॉ. चनगोंडा हविनाळे, नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले, श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभिरे, ज्येष्ठ संचालक तुकाराम काळे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील (कुडल), विद्यासागर मुलगे, श्री सिद्धेश्वर बाजार समितीचे संचालक नागण्णा बनसोडे, श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे संचालक राजशेखर भरले, सूर्यकांत पाटील, सोमनाथ कोळी, सिध्दाराम डुणगे, शकील कुडले (बरूर), बसवराज हसापुरे, रज्जाक निंबाळे, राजू कोळी, महेश नरसगोंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.








