mh 13 news network
सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज अंवती नगर व यश नगर परिसरातील सहा कमान व चौदा कमान नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. नाल्याचा प्रवाह वळविणे किंवा अतिक्रमण केल्याप्रकरणी उत्तमराव निकाळजे, गंगाई सपाटे, मनोहर सपाटे, सुधीर देशमुख, विजय जानकर, शिवानंद धूम्मा यांच्यासह १७ नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.


आयुक्त ओम्बासे यांनी संबंधित विभागाला नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यासाठी आजपासूनच ३ पोकलेन, ४ जेसीबी, ६ डंपर यंत्रणा तैनात करून कामांना वेग देण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान २५ पोलीस बंदोबस्त, ४० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त ओम्बासे यांनी स्पष्ट इशारा दिला की,
“नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नाल्याचा प्रवाह रोखणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही.”

महापालिकेने नागरिकांना स्वच्छ, प्रवाही नाला व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.








