mh 13 news network
लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबई यांच्या सौजन्याने शालेय साहित्याचे वाटप

माढा – माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांसाठी आमदार अभिजीत पाटील यांच्या सौजन्याने व लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबई यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
पूरबाधित विद्यार्थ्यांची व्यथा आमदार पाटील यांनी मंडळापुढे मांडल्यानंतर, मंडळाने तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत या उपक्रमास मंजुरी दिली.
यावेळी आमदार पाटील यांचे बंधू, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली.
या उपक्रमांतर्गत माढा, केवड, उंदरगाव, मानेगाव, राहुलनगर, दारफळ, वाकव, निमगाव मा., खैराव आणि कुंभेज या गावांतील पहिली ते बारावीपर्यंतच्या तब्बल 3200 हून अधिक विद्यार्थ्यांना पुस्तके व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी राजाभाऊ चवरे, आनंदाप्पा कानडे, शहाजी अण्णा साठे, बाळासाहेब पाटील, रामकाका म्हस्के, ज्योतीताई कुलकर्णी, विनंती कुलकर्णी, सुरज देशमुख, बाळासाहेब ढेकणे, सुरेश काका पाटील, दिनेश जगदाळे, भाऊसाहेब महाडिक, भैया खरात, ऋषिकेश तांबिले, आबासाहेब साठे, तसेच सर्व ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक कार्यातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी उभारी मिळाली असून, आमदार अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे








