mh 13 news network
हजारो विद्यार्थ्यांवर दातृत्वाचे संस्कार • 21 शाळांमध्ये उपक्रम • शेकडो किलो धान्य संकलित
सोलापूर – लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला ‘अन्नपूर्णा योजना – एक मुट्ठी अनाज’ हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वी ठरला आहे.
जून महिन्यापासून सुरू असलेल्या या उपक्रमात आतापर्यंत 21 शाळांनी सहभाग नोंदवून शेकडो किलो धान्य संकलित केले आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये दातृत्व, दानाचे महत्त्व व सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणे हा आहे. मुलांमध्ये “दानातूनच संस्कार” हा संदेश पोहोचविण्यात फाउंडेशन यशस्वी ठरले आहे.
हा उपक्रम लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर यांच्या प्रयत्नातून अधिकाधिक शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.
कुडल, माढा, इंगळगी, सलगरवाडी, मंद्रुप, नान्नज, तसेच सोलापूर शहरातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शहर व जिल्ह्यातील सर्व शाळांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे








