Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शिल्पकार राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा गौरव

mh13news.com by mh13news.com
4 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक
0
शिल्पकार राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा गौरव
0
SHARES
0
VIEWS
ShareShareShare

पालक मंत्री जयकुमार रावल

mh 13 news network

महाराष्ट्र शासनाने जगप्रसिद्ध शिल्पकार व धुळे जिल्ह्याचे सुपुत्र राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024’ देऊन त्यांच्या समर्पित प्रतिभासंपन्न कलाकर्तृत्वाचा गौरव केला असून राम सुतार यांनी आपल्या प्रतिभा, समर्पण आणि कष्टातून जागतिक पातळीवर भारताचा गौरव वाढवला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारामुळे त्यांचे कार्य अधिक उजळून निघाले असून हा क्षण धुळे जिल्ह्यासाठी अभिमानाचा असल्याचे सांगत धुळे जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शिल्पकार राम सुतार यांचे अभिनंदन केले आहे.

जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार नोएडा (उत्तर प्रदेश) येथील त्यांच्या राहत्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या प्रतिभासंपन्न व समर्पित कलाकर्तृत्वातून अनेक अजरामर शिल्पकृती निर्माण केल्या आहेत. आज शंभर वर्षांचे असूनही त्यांच्या डोळ्यांसमोर केवळ जगातील उत्तम आणि उत्कृष्ट कलाकृती साकारण्याचे ध्येय आहे. त्यांनी अनेक महापुरुषांच्या शिल्पकृती साकारताना अविश्रांत मेहनत, धैर्य आणि कलाक्षेत्रातील अद्वितीय समर्पण दाखवले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा त्यांच्या प्रतिभेचा आणि योगदानाचा सन्मान आहे, असे ते म्हणाले.

राम सुतार हे धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावाचे सुपुत्र असून त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात असंख्य सुप्रसिद्ध शिल्पे उभी केली आहेत. गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या जगातील उंच पुतळ्याची उभारणी त्यांनी केली आहे. याशिवाय भगवान बुद्ध, भगवान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक महान विभूतींच्या मूर्ती त्यांनी अत्यंत चित्तवेधक आणि जिवंत भासणाऱ्या शैलीत साकारल्या आहेत. या अद्वितीय शिल्प कलागुणामुळे त्यांनी महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे, असे पालक मंत्री रावल म्हणाले.

Previous Post

परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली जखमींची भेट; LNJP रुग्णालयात तब्येतीची विचारपूस

Next Post

संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला मिळणार २६५५ कोटी

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला मिळणार २६५५ कोटी

संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला मिळणार २६५५ कोटी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.