MH 13 news
सोलापूर : Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray ) पक्षाच्या सोलापूर लोकसभा प्रमुखपदी निवड झाल्यानंतर श्री संजय भा. पौळ यांनी आपल्या कार्याची सुरुवात Vitthal Rukmini Temple येथे सपत्नीक दर्शन घेऊन केली. विठुरायाच्या आशीर्वादाने नव्या जबाबदारीची सुरुवात करत त्यांनी जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना संजय पौळ म्हणाले की, परमेश्वर विठुरायाच्या कृपेने आजपासून कार्यारंभ करत असून सर्वसामान्य जनतेतील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणे हेच आपले ध्येय आहे. ही जबाबदारी Uddhav Thackeray व जिल्हा संपर्क प्रमुख Sushma Andhare यांनी दिली असून त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रत्येक शिवसैनिकाला न्याय देत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने संजय पौळ यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. हा सत्कार मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कारंबा गावचे ह.भ.प. दादासाहेब काशीद, गुळवंचीच्या माजी सरपंच सौ. तृप्ती संजय पौळ, शिवसेना विभाग प्रमुख श्रीकांत आदाटे, पृथ्वीराज भैय्या पौळ, सौ. आशाताई काशीद यांच्यासह इतर पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







