Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांचे निधन..

MH13 News by MH13 News
10 months ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांचे निधन..
0
SHARES
271
VIEWS
ShareShareShare

सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी एजाज हुसेन मुजावर यांचे थोड्याच वेळापूर्वी दुःखद निधन झाले.

एजाज मुजावर हे अभ्यासू, व्यासंगी आणि निस्पृह भूमिकेतून पत्रकारिता करणारे धाडसी पत्रकार म्हणून ओळखले जात. संचार या स्थानिक दैनिकातून त्यांनी पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. स्वर्गीय रंगाअण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पत्रकारितेचे मर्म आत्मसात केले. मागील ३८ वर्षांचा त्यांचा दीर्घ, समृद्ध आणि अनुभवी पत्रकारितेचा प्रवास आज समाप्त झाला.सोलापूर शहरातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर त्यांची अचूक, तपशीलवार माहिती होती.

शहर आणि जिल्ह्यातील घटनाक्रम समजून घेण्यासाठी संदर्भग्रंथ म्हणूनच अनेक जण त्यांचा आधार घेत असत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा दुवा होता, तर नवोदित पत्रकारांना दिशादर्शक म्हणून ते सदैव उपलब्ध राहत.गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडू लागली. विस्मृतीचा त्रास वाढू लागल्याने वैद्यकीय तपासणीत मेंदूवर गाठ असल्याचे निष्पन्न झाले. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून काही काळ आराम मिळाला. मात्र प्रकृती पुन्हा ढासळल्याने त्यांना सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आज गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.सोलापूर पत्रकारितेतील एक मार्गदर्शक, निस्पृह आणि तटस्थ आवाज हरपल्याची भावना पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

माजी आमदार रमेश कदम यांच्यावरील खटल्याप्रकरणी कोल्हापूर उच्च न्यायालयातून मोठी अपडेट..

Next Post

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीत शोककळा

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीत शोककळा

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीत शोककळा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.