Wednesday, September 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

MH13 News by MH13 News
2 months ago
in आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
0
SHARES
22
VIEWS
ShareShareShare

MH13 News

३० बेड्सचा आयसीयू, चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, ८ बेड्सचे डायलिसिस सेंटर; समाजाच्या सहकार्याने आरोग्यसेवांचा विस्तार..

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील जुनी आणि नावाजलेली आरोग्यसेवा संस्था म्हणून ओळख असलेल्या एन्. एम्. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलने गेल्या वर्षभरात आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग, ३० बेड्सचा आयसीयू, चार आधुनिक ऑपरेशन थिएटर्स, ८ बेड्सचे डायलिसिस सेंटर, प्रसूती विभाग, कॅज्युअल्टी, वातानुकूलित व स्पेशल रूम्ससह विविध सुविधा आता रुग्णांच्या सेवेत उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या सुविधांची माहिती शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

गुरुपौर्णिमा २०२५ रोजी नूतनीकरण झालेल्या हॉस्पिटलमध्ये ओपीडी, वातानुकूलित औषधालय, २० बेड्सचा वॉर्ड, पॅथॉलॉजी लॅब, सीटी स्कॅन व कॅन्टीन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरात आंतररुग्ण विभागाचे तीन मजले कार्यान्वित करण्यात आले असून, १२ वातानुकूलित खोल्या, ६ स्पेशल रूम्स, १९ बेड्सचा वॉर्ड, प्रसूती विभाग व कॅज्युअल्टी विभाग सुरू करण्यात आला आहे. शहरातील ६७ तज्ज्ञ डॉक्टर येथे सेवा देत असून आधुनिक एक्स-रे, सोनोग्राफी, व्हेंटिलेटर्स, मेडिकल गॅस पाइपलाइन, मल्टीपॅरा मॉनिटर्स आदी सुविधा उपलब्ध आहेत. एनएचपीसीएलच्या सहकार्याने फ्रेझेनियस कंपनीच्या अत्याधुनिक मशिन्ससह ८ बेड्सचे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. डी-मार्ट फाउंडेशनच्या मदतीतून उभारण्यात आलेल्या चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सच्या संकुलाचे उद्घाटन रविवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता डी-मार्टचे संचालक एन. भास्करन यांच्या हस्ते होणार आहे.

एलआयसी गोल्डन ज्युबिली फाउंडेशनच्या सहकार्याने जर्मनीतून कार्ल झाईस कंपनीचा आधुनिक ऑपरेटिंग मायक्रोस्कोपही उपलब्ध करून देण्यात आला आहे. भविष्यात कॅथलॅब, कार्डिओलॉजी विभाग, नवजात शिशु आयसीयू, नर्सिंग कॉलेज आणि कर्करोग निदान व उपचार विभाग सुरू करण्याचे नियोजन आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रवीणसिन्ह परदेशी यांनी समाजासाठी उभारलेल्या या हॉस्पिटलमध्ये वाजवी दरात दर्जेदार उपचार देण्याचा संकल्प व्यक्त केला. मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी भविष्यात अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून सोलापूरकरांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी संचालक मंडळ, तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

हॉस्पिटलच्या उभारणीसाठी श्री. चंद्रकांत पटवर्धन व परिवार, श्रीमती मंगलेशा बेदमुथा, भुतडा परिवार, ओसवाल केमिकल्स, वामसी लॅब, श्री. बाहेती, श्री. गिरीश बक्षी, श्रीमती नंदा करवा, श्री. कौस्तुभ करवा व सोनी परिवार, विश्व रचना इन्फ्रा, हॉटेल राजयोग, कै. उत्पल पटेल यांचे स्नेही, आसावा कुटुंब, श्री. बाबूभाई मेहता, ओसी स्पेशालिटीज, श्री. लोहे, एस.व्ही.एस. सोर्सिंग, रामसुख संतोकीराम चंडक ट्रस्ट, श्री. माळवदे कुटुंबीय, जनकल्याण समिती, अल्ट्राटेक कंपनी, बँक ऑफ इंडिया तसेच असंख्य दानशूर व्यक्तींनी आर्थिक व साहित्य स्वरूपात मोलाचे योगदान दिले.

पत्रकार परिषदेला राम रेड्डी, डॉ. शिरीष कुमठेकर, डॉ. सुनील मेहता, डॉ. संदीप भागवत, डॉ. राजेंद्र घुली, डॉ. विजय सावस्कर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोडल, वासुदेव बंग, संजयभाई पटेल, कल्पेश झवेरी, राजेश गांधी, राजन रिसबुड, श्रीमती सविता लळीत, श्री. रामदासी, जाम मिलचे राजेश दमाणी, सेवाव्रती, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

Next Post

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.