Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

स्वतःच्याच आईला शिवीगाळ करणाऱ्या मित्राच्या खून आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता..

MH13 News by MH13 News
3 months ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
Vaibhav waghe Murder case | प्रमोद गायकवाडसह दोन्ही मुलांच्या जामीन अर्जावर न्यायालयातून update..
0
SHARES
155
VIEWS
ShareShareShare

सोलापूर- तोडकर वस्ती बाळे येथील लखन रघुनाथ गायकवाड हा दारू पिऊन स्वतःच्याच आईला शिवीगाळ करीत असल्याने व समजावून सांगूनही ऐकत नसल्याने त्याचा लाकडी दांडकंयाने व प्लास्टिक पाईपने मारहाण करून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपी नागेश कोळेकर व आशुतोष ऊर्फ आवि गाडेकर दोघे रा. तोडकर वस्ती, बाळे, सोलापूर यांची मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (श्री. कटारिया सो) यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकिकत अशी की, दि.16/5/2024 रोजी दुपारी 4.30 वा चे सुमारास नागेश कोळेकर व आशुतोष गाडेकर हे फिर्यादी अल्का रघुनाथ गायकवाड यांचा मुलगा लखन यास घरी घेवून आले होते. त्यावेळी फिर्यादीचे गल्लीतील अजय मोहन भोसले हा घरी आला होता त्यावेळी लखन हा फिर्यादीस दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून अश्लील शिवीगाळ करीत होता.

त्यावेळी नागेश व आशुतोष हे आईला का शिव्या देतो,शिव्या देवू नको असे सांगत होते परंतु लखन हा कोणाचेही ऐकत नव्हता व उलट त्यांना देखील शिविगाळ करीत होता त्यामुळे नागेश व आशुतोष हे लखन यास तुला सांगितलेले कळत नाही काय, शिव्या कशाला देतो, आज तुला दाखवतोच असे म्हणून नागेश याने लाकडाचे दांडका व आशुतोषने प्लास्टिक पाईपने लखनच्या हतास,पायास, पाठीवर, छातीवर व सर्व अंगावर जोराने मारहाण करू लागले.त्यावेळी लखन हा मला मारू नका असे ओरडत होता.ते दोघे लखनला मारहाण करू लागल्याने मी त्यांना अरे लखन दारू प्यायला आहे, त्याला कळत नाही, तुम्ही त्याला मारू नका असे फिर्यादी व अजय भोसले हे समजवून सांगत असताना ते काही एक एकत नव्हते त्यानंतर ते दोघे लाकडी दांडकं व प्लास्टिक पाईप घेऊन घरातून निघून गेले. लखन च्या अंगावर मारहाणीचे वण असल्याने फिर्यादीचे घराजवळच राहणारे नर्सला बोलावून घेऊन तपासले असता त्यांनी लखनला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले.

आरोपींनी फिर्यादीच्या समोर मारहाण केल्याने फिर्यादी घाबरलेली होती. त्यानंतर फिर्यादीने सदरची घटना मुलगा राम व सर्व नातेवाईक यांना सांगितली व उपचारादरम्यान लखन चा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याचे फिर्याद फिर्यादीने आरोपींविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी नागेश कोळेकर व आशुतोष गाडेकर यांना अटक केली होती तेव्हापासून आरोपी हे न्यायालयीन कोठडीत होते.तद्नंतर आरोपींविरुद्ध तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपींविरुद्ध भरलेल्या खटल्यात सरकार पक्षाने एकूण 14 साक्षीदार तपासले.

आरोपीतर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना न्यायालयासमोर आलेला हत्यारजप्ती व वैद्यकीय पुरावा संशयास्पद असल्याचे दाखवून पुराव्याची साखळी पूर्ण होत नसल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायमूर्तींनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड.राहुल रूपनर अँड मीरा पाटील अँड सोहेल शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. प्रकाश जन्नु यांनी काम पाहिले.

Previous Post

सोलापूरात बिनविरोधसाठी भाजपाचे दबावतंत्र; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Next Post

प्रभाग ६ | आज रविवारी भाजप प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; ‘देगाव’मध्ये पालकमंत्री यांचा जनसंवाद..

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
प्रभाग ६ | आज रविवारी भाजप प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; ‘देगाव’मध्ये पालकमंत्री यांचा जनसंवाद..

प्रभाग ६ | आज रविवारी भाजप प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; 'देगाव'मध्ये पालकमंत्री यांचा जनसंवाद..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.