Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर

mh13news.com by mh13news.com
4 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सोलापूर शहर
0
ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

भारत निवडणूक आयोगाचे आवाहन

नवी दिल्ली भारत निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ECINet हे नवीन एकात्मिक ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना १० जानेवारी पर्यंत देण्याचे आवाहन केले आहे. वापरकर्ता नागरिक ॲपमधील ‘Submit a Suggestion’ या पर्यायाद्वारे आपल्या सूचना नोंदवू शकतात.

ECINet ॲपच्या  प्रायोगिक आवृत्तीच्या माध्यमातून मतदारांना उत्तम सेवा पुरवण्याबरोबरच मतदानाच्या टक्केवारीचे कल त्वरित उपलब्ध करून देणे आणि मतदानानंतर फक्त ७२ तासांच्या आत इंडेक्स कार्ड प्रसिद्ध करणे अशा सुविधा पूरविणे शक्य होणार आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने लागत होते. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ तसेच विविध पोटनिवडणुकांवेळी या ॲपची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, निरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे या ऍप मध्ये  सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता नागरिकांकडून मिळालेल्या सूचनांचेही परीक्षण करून ॲपला अधिक वापरकर्ताभिमुख बनवले जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ECINet ॲपचा अधिकृत शुभारंभ करण्याचे प्रस्तावित आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाने हा महत्त्वाकांक्षी पुढाकार घेतला आहे. ४ मे २०२५ रोजी या ॲपची घोषणा करण्यात आली होती आणि तेव्हापासून  ऍप विकसित करण्याचे काम सुरू आहे.

ECINet हे एकाच ठिकाणी विविध निवडणूक-संबंधित सुविधा उपलब्ध करणारे एकात्मिक ॲप आहे. यामध्ये Voter Helpline App, cVIGIL, Saksham, Voter Turnout App, Know Your Candidate आदींसह एकूण ४० स्वतंत्र ॲप्लिकेशन्स आणि संकेतस्थळांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.

 00000000

Previous Post

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान अजरामर; सोहन लोंढे यांच्या आठवणींना उजाळा

Next Post

संपर्क, संघटन आणि सोशल मीडियावर भर द्या; भाजप उमेदवारांच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
संपर्क, संघटन आणि सोशल मीडियावर भर द्या; भाजप उमेदवारांच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन

संपर्क, संघटन आणि सोशल मीडियावर भर द्या; भाजप उमेदवारांच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.