mh 13 news network
दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत रणशिंग फुंकले; सोलापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार
सोलापूर lदिनांक, ०५ जानेवारी २०२६

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अधिकृत प्रचाराचा भव्य शुभारंभ करून रणशिंग फुंकले आहे. आघाडी स्थापन करणे, उमेदवारी जाहीर करणे यासह सर्वच पातळ्यांवर महाविकास आघाडीने निर्णायक आघाडी घेतली असून, सोमवार दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता हेरिटेज सी लॉन, गांधी नगर, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. महाविकास आघाडीचे नेते खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, कॉ. नरसय्या आडम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, लोकसभा समन्वयक प्रशांत इंगळे, ज्येष्ठ नेते शंकर पाटील, भारत जाधव, कॉ. युसुफ मेजर यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीची स्पष्ट भूमिका, धोरणे व दिशा जनतेसमोर मांडण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या एकजुटीचे दर्शन घडवत आगामी निवडणुकीसाठी जोरदार प्रचार मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
१५ जानेवारी रोजी सोलापूरकर जनता विकासासाठी मतदान करणार असून, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह आघाडीतील सर्व नेतेमंडळींच्या मार्गदर्शनामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, विजयाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे








