MH 13 NEWS NETWORK
स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कुंभारी येथील माँसाहेब घरकुल वसाहतीतील बाळासाहेब ठाकरे सभागृहात माँसाहेब मीनाताई ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित बिडी कामगार व कामगार सेना पदाधिकारी बंधू भगिनी यांनी अमर रहे अमर रहे माँसाहेब अमर रहे, माँसाहेब मीनाताई ठाकरे जिंदाबाद, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या त्यानंतर विडी कामगार बंधू-भगिनी व त्यांच्या पाल्यांना लाडू वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज), बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल कुराडकर, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी संतोष जाधव, प्रशांत जक्का, भाग्यलक्ष्मी त्रिमल
रेणुका मच्छा, अंबिका व्हनमाने रामबाई नल्ला, रजनी बिटला विजयालक्ष्मी गुर्रम, मिराबाई गुर्रम, शारदा कामूर्ति, सुवर्णा कोमाकुल, वनिता बल्ला आदी उपस्थित होते








