लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा 25, अकोला 17, अमरावती 56, वर्धा 26, यवतमाळ-वाशिम 20, हिंगोली 48, नांदेड 66, आणि परभणी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिल 2024 ही असून या मतदारसंघांसाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होईल