mh 13 news network
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यलढ्यात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सोलापूरच्या चार हुतात्मे — हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा किसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे व हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन — यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते चारही हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्याग, शौर्य व राष्ट्रनिष्ठेला उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रदेश सचिव राहुल वर्धा, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे, शकील मौलवी, राजन कामत, रुस्तुम कंपली, माजी महिला अध्यक्ष करीमुन्नीसा बागवान, सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, शोभा बोबे, रेखा बिनेकर, नूरअहमद नालवार, विवेक कन्ना, सागर उबाळे, धीरज खंदारे, अभिलाषु अच्छुगटला, रतन डोळसे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभिवादन कार्यक्रमातून हुतात्म्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन संविधान, लोकशाही व राष्ट्रीय एकतेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश देण्यात आला








