MH13NEWS network
मार्डी | प्रतिनिधी
मार्डी येथील श्री नागनाथ महाराज व पुजारी नागेश महाराज यांचे आशीर्वाद घेत तालुक्याचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी शनिवारी सकाळी प्रचार मोहिमेची सुरुवात केली. मंदिरात नमस्कार केल्यानंतर “ना भीती, ना भय… नागनाथ महाराज की जय” असा जयघोष करत काकांनी सहकाऱ्यांसह पायी चालत प्रचाराला प्रारंभ केला.


यानंतर नागरिकांशी आणि लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधत घराघरात प्रचार पत्रके वाटप करण्यात आली. काका साठे यांच्यासोबत प्रल्हाद काशीद, सुवर्णा झाडे, बाबासाहेब पाटील, संभाजी भडकुंबे, शशिकांत मार्तंडे यांनी प्रचारात सहभाग घेतला.



विशेष म्हणजे 84 वर्षांच्या वयातही काका साठे तितक्याच जोमाने प्रचारात उतरले असून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात या वयात निवडणूक लढवणारे ते मोजकेच नेते ठरत आहेत. त्यांच्या उत्साहामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली आहे.
मार्डी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील एकरुख–तरटगाव येथे काका साठे आणि पंचायत समिती उमेदवार काजल जगताप यांची प्रचार फेरी काढण्यात आली. विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करत मतदारांशी थेट संपर्क साधण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष सुवर्णा झाडे, प्रल्हाद काशीद, बाबासाहेब पाटील, संभाजी भडकुंबे, शशिकांत मार्तंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








