Monday, September 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

MH13 News by MH13 News
2 months ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
0
SHARES
98
VIEWS
ShareShareShare

MH 13 News

१,६८८ मतदार ठरवणार नवी कार्यकारिणी; ४ ऑगस्टला मतदान, ५ ऑगस्टला निकाल

सोलापूर | प्रतिनिधी

सोलापूर बार असोसिएशनच्या सन २०२६-२०२७ च्या वार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने सर्वच प्रमुख पदांसाठी अटीतटीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे १,६८८ मतदार असलेल्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत ४ ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण विधी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षपदासाठी ॲड. संतोष पाटील, ॲड. एस. आर. रेशमे, ॲड. राजेंद्र फताटे आणि ॲड. मल्लिनाथ म्हमाणे यांच्यात प्रतिष्ठेची चौकोनी लढत होणार आहे. तर खजिनदारपदासाठी तब्बल पाच उमेदवार रिंगणात असल्याने सर्वाधिक चुरशीची पंचरंगी लढत याच पदासाठी पाहायला मिळणार आहे.

उपाध्यक्ष (खुला गट) पदासाठी ॲड. परमानंद जवळकोटे आणि ॲड. परवेज ढालायत यांच्यात थेट सामना होणार आहे. महिला राखीव उपाध्यक्षपदासाठी ॲड. शर्मिला देशमुख व ॲड. उर्मिला जहागीरदार आमनेसामने आहेत. सचिवपदासाठी ॲड. जयप्रकाश भंडारे आणि ॲड. मंजुनाथ कक्कलमेली यांच्यात लढत रंगणार आहे.

खजिनदारपदासाठी ॲड. सिद्धाराम पाटील, ॲड. संतोषकुमार बाराचारे, ॲड. अंजली बाबरे, ॲड. नरेंद्रकुमार गावडे आणि ॲड. मंगेश कंदलगावकर हे पाच उमेदवार रिंगणात आहेत.

सहसचिवपदासाठी ॲड. प्रियंका गोरंटी, ॲड. मेघना मलपद्दी आणि ॲड. आर. एल. लगशेट्टी (गोटीपामुल) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

माघारीची मुदत संपताच न्यायालय परिसरात प्रचाराने वेग घेतला आहे.

विविध पॅनेल तसेच अपक्ष उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, प्रचारपत्रकांचे वितरण आणि संपर्क मोहिमेला गती दिली असून निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून सायंकाळी ६.०० वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होईल. दि. ५ ऑगस्ट रोजी विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा करून नव्या कार्यकारिणीचा पदभार सोहळा पार पडणार आहे.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. बाबासाहेब जाधव कार्यरत आहेत. त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. बसवराज हिंगमिरे, ॲड. अविनाश बिराजदार, ॲड. संजय पवार, ॲड. प्रवीण कुलकर्णी, ॲड. विकास कुलकर्णी आणि ॲड. शुभम माने हे सहकार्य करत आहेत.

Tags: Bar associationCourtsolapurSolapur Maharashtra
Previous Post

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.