Wednesday, July 29, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

MH13 News by MH13 News
23 hours ago
in आरोग्य, धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
0
SHARES
140
VIEWS
ShareShareShare

MH13 News Network

मुंबई / सोलापूर : सोलापूर शहरातील भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे राहणाऱ्या समर्थ योगीनाथ स्वामी (वय ९) या चिमुकल्याचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यानंतर रेबिजमुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी मंगळवारी (दि. २८ जुलै) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समर्थ स्वामी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मंजूर करण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडे सविस्तर निवेदनही सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २३ जुलै २०२६ रोजी समर्थ स्वामी याचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबिजने मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून मयत बालकाचे वडील कॅन्सरग्रस्त आहेत. समर्थ हा त्यांच्या कुटुंबातील एकमेव अपत्य होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हालाखीची असल्याने या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्यावर मानसिक आणि आर्थिक असे दुहेरी संकट ओढवले आहे. त्यामुळे मानवीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रस्ताव सोलापूर प्रशासनाकडून तातडीने मागवून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनीही प्रस्ताव तातडीने मागवून संबंधित कुटुंबाला शक्य तितक्या लवकर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल उपस्थित होते.

याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “समर्थसारख्या निरागस चिमुकल्याचा मृत्यू ही संपूर्ण सोलापूरकरांच्या मनाला चटका लावणारी आणि अत्यंत वेदनादायी घटना आहे. या दुर्दैवी घटनेने मला वैयक्तिकरित्या अस्वस्थ केले. त्यामुळे आज महापौर विनायक कोंड्याल यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समर्थच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी निवेदन सादर केले. मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ सकारात्मक निर्णय घेत संबंधित विभागाला प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुमारे पाच लाख रुपयांची मदत मिळण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. भविष्यात सोलापूरमध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”

सोलापूरकरांची प्रतिक्रिया..!

“अवघ्या नऊ वर्षांच्या समर्थचा अकाली अंत हा केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण सोलापूरच्या मनाला चटका लावणारा प्रसंग ठरला. आता त्याच्या कुटुंबाला आधार देतानाच भविष्यात अशा कोणत्याही निरागस जीवाचा बळी जाऊ नये, हीच सोलापूरकरांची अपेक्षा आहे.”

Tags: BJP MaharashtraDevendra fadanvisMLA Devendra KothesolapurSolapur Maharashtra
Previous Post

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

Next Post

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

Related Posts

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
कृषी

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

1 July 2026
शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
Next Post
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.