MH13 News
माढा : आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढा येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये तब्बल ९७० रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच मोफत चष्मे वाटप, वाचादोष शस्त्रक्रिया आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड करण्यात आली.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अभिजीत आबा पाटील सातत्याने प्रयत्नशील आहेत. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून अनेक रुग्णांचे अचूक निदान होऊन त्यांच्यावर योग्य उपचार होत असून ही सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे कार्य सुरू आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद वनकळस यांनी केले.बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या प्रयत्नातून माढा येथे डायलिसिस युनिट मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मतदारसंघातील रुग्णांना आतापर्यंत ३ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे. मोठ्या उपचारासाठी कोणत्याही रुग्णाला बाहेर जावे लागल्यास त्यासाठी आमदार पाटील यांची यंत्रणा २४ तास कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाआरोग्य शिबिरात ९७० रुग्णांची मोफत तपासणी व उपचार, ६ रुग्णांवर वाचादोष शस्त्रक्रिया, ५७ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड तसेच ३२० गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी १५० हून अधिक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि आशा वर्कर्स यांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी विलासबप्पा देशमुख, ॲड. बाळासाहेब पाटील, आनंद कानडे, रावसाहेब देशमुख, रामचंद्र मस्के, ज्योतीताई कुलकर्णी, बालाजी पाटील, दीपक आबा देशमुख, डॉ. संतोष दळवी, कुरण गिड्डे, शिवाजी सुर्वे, दिनेश जगदाळे, बाबासाहेब पारडे, राजाभाऊ भांगिरे, वैभव गोरे, तुकाराम जाधव, इसाक काझी, मारुती राऊत, सलीम पिंजारी,संतोष मुटकुळे, ओंकार गवसने, कल्याण गाडे, उत्तम पालकर, सागर कांबळे, राजाभाऊ यादव, शंभू साठे, आबासाहेब साठे, राहुल जाधव, अच्युत उमाटे, भारत खंडागळे, वैभव पाटील, जावेद पठाण, रवी सरवदे, जितेंद्र जमदाडे, भैय्या खरात, यु. एफ. जानराव, अभिजीत उबाळे, अक्षय शिंदे, तुषार बारबोले यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







