Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लोकसभा निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश ⭕

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
लोकसभा निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश ⭕
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नाशिक जिल्ह्यातील 20-दिंडोरी आणि 21-नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी  दि. 26 एप्रिल ते 3 मे या कालावधीत नामनिर्देशन पत्र उमेदवारांना दाखल करता येणार आहे. लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्च करण्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस आधी नवीन स्वतंत्र बॅंक खाते उघडून घेणे आवश्यक आहे. उमेदवारास बॅंक खाते कोणत्याही बॅंकेत ( सहकारी बॅंकेसह ) किंवा पोस्टात उघडता येईल. उमेदवाराने त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीच्या नावे किंवा अन्य व्यक्तीच्या नावे खाते उघडू नये. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी उमेदवारांनी दिलेल्या निर्देशानुसार नवीन बॅंक खात्याचा क्रमांक व तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात कळवावा. उमेदवाराने निवडणुकीसाठी खर्च करावयाचा पैसा याच खात्यात जमा करावा आणि निवडणुकीसाठी येणारा सर्व खर्च याच बॅंक खात्यातून करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चासाठीचे  बॅंक खाते उमेदवाराने स्वत:च्या नावे किंवा उमेदवार आणि त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांचे संयुक्त खाते उघडावे. उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेसाठी नवीन बॅंक खाते उघडावे, यापुर्वीचे खाते निवडणूक खर्चासाठी उपयोगात आणू नये.

नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी उमेदवारांनी उपरोक्त निर्देशानुसार उघडलेल्या नवीन बॅंक उघडल्याबाबत त्या खात्याचा क्रमांक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिला नाही तर निवडणूक निर्णय अधिकारी संबंधित उमेदवारास लेखी स्वरूपात नवीन बॅंक खात्याचा तपशील सादर करण्याबाबत कळवतील. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष यांनी या सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी  आयोगाच्या या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.

Previous Post

नांदेड लोकसभा संदर्भिकेचे जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते प्रकाशन

Next Post

ब्रेकिंग |’या ‘भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करण्याची सकल मराठा समाजाची मागणी

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

ब्रेकिंग |'या 'भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करण्याची सकल मराठा समाजाची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.