Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लोकसभेच्या ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
लोकसभेच्या ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

 लोकसभा निवडणूक २०२४

MH 13 NEWS NETWORK

केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ; ६ नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी मतदारापासून आयोगापर्यंत संपर्कात

नांदेड, दि. २५: जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी ३ हजार ४१ मतदान केंद्रे आहेत. त्यातील संवेदनशील केंद्रांसह ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग यंत्रणा बसविली आहे. ५० टक्के मतदान केंद्रांवरील मतदानादिवशीची प्रत्येक हालचाल जिल्हाधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येणार आहेत

नांदेड लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. नांदेड लोकसभा मतदारसंघात २ हजार ६२ मतदान केंद्र आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील  १ हजार ३५९ मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची सुविधा केली आहे. याद्वारे या मतदान केंद्रावरील हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयात बसून पाहता येणार आहेत.  हिंगोली मतदार संघातील किनवट तालुक्यातील १६४ तर हदगाव तालुक्यातील १६९ मतदान केंद्रांचाही यामध्ये समावेश आहे.

वेबकॉस्टिंगसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे सनियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रफुल्ल करर्णेवार यांच्या मार्गदर्शनात हा कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे हे कक्षाचे प्रमुख असून सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी निखिल बासटवार यांच्यासह शिवानंद स्वामी, मिरज धामणगावे, शाहेद हुसेन, विठ्ठल लाड आदी परिश्रम घेत आहेत. विधानसभा मतदारसंघनीय वेबकॉस्टिंग चालू असलेल्या मतदान केंद्रांवर काही अनुसूचित प्रकार निदर्शनात आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.

६ नियंत्रण कक्षातून निगराणी

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाच्या दिवशी ६ नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहणार आहे. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, माध्यम कक्ष, ईव्हीएम व जीपीएस नियंत्रण कक्ष, वेब कास्टिंग, एनकोर कक्ष, कम्युनिकेशन कक्ष. यामधील निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष व माध्यम कक्ष मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या आदल्या दिवशी वृत्तवाहिन्यावर प्रसारित होणाऱ्या बातम्यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती देणे व वृत्तपत्रांना आकडेवारी देण्याचे काम करणार.

ईव्हीएम व जीपीएस नियंत्रण कक्षाद्वारे ईव्हीएम वाहतुकीवर नियंत्रण ठेवली जाते. ईव्हीएम घेऊन जाणारी वाहने कुठे आहेत. त्यांचे लोकेशन काय आहे ,यावर या कक्षामार्फत नियंत्रण ठेवले जाते. वेब कास्टिंग कक्षाद्वारे प्रत्येक विधानसभानिहाय ५० टक्के केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येते. याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व संबंधित केंद्रांवर सुरू असलेल्या हालचालीवर नियंत्रण ठेवले जाते.

एन्कोर कक्षामार्फत निवडणूक आयोगाला दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी दिली जाते. विहित नमुन्यातील ही टक्केवारी आयोगाला वेळेत सादर करण्याची जबाबदारी या समितीकडे आहे. कम्युनिकेशन कक्षामार्फत इतर सर्व कक्षाशी समन्वय ठेवण्यात येईल व जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी सर्व ठिकाणीची माहिती दिली जाईल.

Previous Post

अखेरीस सोनिटिक्स क्रिप्टोकरन्सी चालक वकिलास अटक ,एक कोटीची फसवणूक | पुणे सायबर पोलिसांची कामगिरी

Next Post

मतदार जागरुकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
मतदार जागरुकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन

मतदार जागरुकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.