Pune
अभासी चलनात (क्रिप्टोकरन्सी – Cryptocurrency) गुंतवणूक केल्यास 20 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने (Lure Of Good Returns) एक कोटी 10 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) अटक केली आहे. सायबर पोलिसांच्या या कामगिरीमुळे देशभरातील एक मोठा क्रिप्टो करेन्सी घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांना तब्बल २० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून १ कोटी १० लाखांची फसवणूक करीत पसार झालेल्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने सोनिटॅक्स नावाने क्रिप्टोकरन्सी तयार करुन गुंतवणूकीच्या अनेक पटींनी मोबदला देण्याचे आमिष दाखविले होते. दाखल गुन्हयात अटकपुर्व जामीन नामंजूर झाल्यावर तो पसार झाला होता. मात्र, सायबर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संतोष पोपट थोरात (रा. खराडी,पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
संतोष थोरात याने सोनिटिक्स नावाचे (Sonitix Exchange) अभासी चलन तयार करुन त्यामध्ये गुंतवणूक केल्यास वार्षीक 20 टक्के परतावा देण्याचे आमिष नागरिकांना दाखवले. गुंतवणुकीच्या अनेक पटीमध्ये परतावा मिळण्याच्या अपेक्षेने फिर्यादीसह तक्रारदारांकडून 1 कोटी 10 लाख रुपये गुंतवले होते. मात्र, आरोपीने कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता फसवणूक केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Cheating Fraud Case Pune)
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी संतोष थोरात याने अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता.मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईल क्रमांक बदलला.
राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो गाड्या विक्री करत होता.सायबर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणावरुन त्याचा माग काढून त्याला
बेड्या ठोकल्या. आरोपीला वाघोली परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
संतोष थोरात यावर या आधीही अशाच प्रकारचे अनेक आर्थिक गुन्हे दाखल असून पोलीस याचा कसून तपास करत आहेत.
फसवणूक झालेल्यांनी सायबर विभागात तक्रार द्यावी
अभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक झालेल्या नागरिकांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करावी,
असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोनिटिक्स नावाचे अभासी चलनामध्ये ज्या-ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे.
त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात यावे असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. (Shivaji Nagar Cyber Police Station)
ही कारवाई पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे (ACP RN Raje) यांच्या मार्गदर्शनासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील (PI Minal Supe Patil), संदीप मुंढे, संदीप पवार, दिनेश मरकड यांच्या पथकाने केली.