MH 13 NEWS NETWORK
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून रविंदर सिंधू (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक श्री.सिंधू यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथील कक्ष क्रमांक २०८ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३२४८९३७४५ आणि इमेल आयडी exp30mumbai@gmail.com हा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी संदीपान मते असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४५११६२१ हा आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक श्री.सिंधू यांना सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे दुपारी १२ ते १२.३० वा. उमेदवारांना भेटण्याची वेळ तर नागरिकांनी भेटण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असणार आहे.
Good day! Do you know if they make any plugins to assist with
SEO? I’m trying to get my site to rank for some targeted keywords but I’m not
seeing very good gains. If you know of any please share.
Kudos! I saw similar art here: Eco product