Tuesday, October 27, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘शोला ‘ पूर.! @44 .!! अबे..लई गरम व्हतयं..! पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in Blog, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
78
VIEWS
ShareShareShare

महेश हणमे / 9890440480

संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट आली असून राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. सोलापूर की शोलापूर.? असंच वाटत असून आज मंगळवारी ४४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. जिकडे बघावे तिकडे सोलापूरकर अबे, लय गरम व्हतयं..! माणूस वाळून चाललाय बे..!! अशीच चर्चा सुरू आहे.

इतके कडक उन पडत आहे की दुपारी रस्ते निर्मनुष्य दिसत असून कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. प्रत्येकाला 20 रुपयाची पिण्याच्या पाण्याची बाटली परवडणे शक्य नसल्याने पाणपोईकडे सर्वसामान्य नागरिक वळतो. परंतु सामाजिक संघटनेचे दुर्लक्ष होत असल्याने पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात उष्णतेची लाट..


राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला असून मंगळवारी ४४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे. रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला.  राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. सोलापुरातही कमाल तापमानाचा पारा ४३.७ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती. एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने या निमित्ताने वर्तवण्यात येत आहे.

उष्माघातामुळे राज्यात हाहाकार माजला असून शासनाने उष्माघातापासून काळजी घ्यावी असे आवाहन केलेले आहे. विशेष म्हणजे वृद्ध व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील केले आहे.

मुक्या जीवाचे काय हाल होत असतील..?

सोलापुरात पाच किंवा सहा दिवसाला एकदा पाणी येते. आधी जागोजागी पाणपोया दिसायच्या. आता ते प्रमाण खूप कमी झाले आहे. मुक्या जनावरांसाठी रस्त्याच्या कडेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जायची. आता क्वचितच कुठेतरी असे दिसते. अशा मुक्या जीवाचे काय हाल होत असतील.? सामाजिक संस्था, संघटनानी याबाबतीत पुढे येण्याची अपेक्षा आहे.

Tags: solapur
Previous Post

महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करावे – मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Next Post

‘बुलडोझर बाबा’ उद्या सोलापुरात ; राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

23 October 2026
मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
Next Post

'बुलडोझर बाबा' उद्या सोलापुरात ; राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.