MH 13 NEWS NETWORK
जिजामाता कृषी भूषण पुरस्कार विजेत्या सुजाता गाट
सोलापूर, दि. ८ शतायुषी परिवार गेल्या ८ वर्षापासून थायरॉईड, वजन कमी करणे, कॅन्सर व लखवा आदी असाध्य रोगावर काम करत असून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर यश मिळविले आहे. त्यासाठी दवाखान्यात जाण्याअगोदर शतायुषी परिवाराशी विनाशुल्क ऑनलाईन सल्ला घ्या, असे आवाहन कोल्हापूरच्या जिजामाता कृषी भूषण पुरस्कार विजेत्या सुजात गाट बोलत होत्या.
शतायुषी परिवारातर्फे ऑफिसर्स क्लबच्या हॉलमध्ये चर्चासत्रात मार्गर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी विजय शेटे, डॉ. प्रसाद पाटील यांनीही मार्गदर्शन केले. येथील पद्मजा पाटील, डॉ. अजित माणिकशेटे, मंगल पांढरे व स्वरुपा कोठारी यांनी आपण दवाखान्यात न जाता आरोग्याची कशी काळजी घेतली याचे अनुभव कथन केले. आरोग्याची काळजीसाठी विनाशुल्क सल्ला, योग व व्यायाम यासाठी येथील वेलनेसच्या संचालिका स्वरुपा कोठारी (मो.७२७६१४७०२५) यांच्याशी संपर्क साधावा.
—