MH 13 News Network
शहरातील उपक्रमवीर ओळख असणारे दांपत्य म्हणजे काशिनाथ आणि संगीता भतगुणकी..! यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर भोजनालय या शुद्ध शाकाहारी हॉटेलचे भव्य शुभारंभ त्यांच्या आई-वडिलांच्या हस्ते करण्यात येणार असून शुद्ध शाकाहारी घरगुती पद्धतीचे पारंपारिक जेवण देण्याचा प्रयोग काशिनाथ करणार आहेत.
उद्घाटनानिमित्त 250 रुपयांची अमर्याद थाळी फक्त 78 रुपयांमध्ये देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. विशेष म्हणजे भाजीपाल्यासाठी सेंद्रिय भाजीपाला वापरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना भतगुणकी यांनी सांगितले की..