MH 13News Network
सोलापुरात डेंग्यूचा प्रादुर्भाव; दिलीप माने विचार मंचाकडून धूर फवारणी अभियान
सोलापूर : शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरिया आजाराने सध्या डोके वर काढले आहे. जुळे सोलापूर, डोणगाव रोड, देगाव रोड, नीलम नगर, विजापूर रोडसह शहरातील अनेक भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सदर परिस्थितीचे गांभिर्य ओळखून दिलीप माने विचार मंचाच्या वतीने सोलापुरच्या विविध भागात मोफत धूर फवारणी अभियान राबवण्यात येत आहे.
शहराला ६ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. यामुळे काही नागरिक उघड्यावर पाणी साठवून ठेवतात. अशात पावसाळी वातावरणामुळे डेंग्यू पसरविणाऱ्या अळ्या किंवा एडिस प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. परिणामी शहरासह हद्दवाढ भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जुळे सोलापूर, नीलम नगर, नई जिंदगी, आरटीओ, विजापूर रोड, डोणगाव रोड, देगाव रोडसह शहरातील विविध भागात डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचे रूग्ण वाढत असल्याने, दिलीप माने विचार मंचाकडून शहरातील विविध भागात मोफत धूर फवारणी अभियान राबवण्यात येत आहे. जुळे सोलापूर, नीलम नगर, नई जिंदगी, आरटीओ, विजापूर रोड या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर फवारणी करण्यात आल्याची माहिती दिलीप माने विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच ही मोहिम आणखी मोठ्या स्तरावर राबवण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सोलापूरकरांच्या आरोग्याची काळजी घेत धूर फवारणी अभियान राबवण्यात येत असल्याने नागरिकांमधून या दिलीप माने विचार मंचाच्या या अभियानाचे कौतुक करण्यात येत आहे.
डेंग्यू, मलेरियासदृश रुग्ण आढळताच त्यांची रक्ताची तपासणी केली जाते. त्याचा अहवाल येईपर्यंत रुग्णांवर उपचार डेंग्यू व मलेरियाचे उपचार सुरू करण्यात येतात. ऑगस्टच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात संशयित डेंग्यूची रुग्णसंख्या ही ५० पर्यंत पोहोचली, असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
डेंग्यू वाढू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी
डेंग्यू पसरविणाऱ्या अळ्या किंवा एडिस प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. यामुळे नागरिकांनी घरात जास्त वेळ पाणी साचवून ठेवू नये. तसेच अंगभर कपडे घालावे. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. महत्वाचे म्हणजे, ताप आल्यास अंगावर न काढता लगेच दवाखान्यात जावे.
Sumber : EU303
Sumber : Slot Online
Sumber : Slot Online