Monday, August 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur: भाऊ तोरसेकर, भूषणकुमार उपाध्यायांसह मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांची मेजवानी..

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
63
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

भाऊ तोरसेकर, भूषणकुमार उपाध्यायांसह मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांची मेजवानी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे बौद्धिक व्याख्यानमाला

सोलापूर : प्रतिनिधी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याहीवर्षी गणेशोत्सवानिमित्त बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात ही व्याख्यानमाला होणार आहे. व्याख्यानमालेचे हे ४८ वे वर्ष आहे.

या व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिरात होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे राहणार आहेत. पहिल्या दिवशी सिने कलावंत, अभिनेते सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत निवेदिका मंजुषा गाडगीळ घेणार आहेत.

व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे गुंफणार आहेत. ‘विकसित भारताचे उद्दिष्ट आणि शिक्षणाची भूमिका’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर रविवार १५ सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतील. ‘कायदा, व्यवस्था आणि लोकशाही’ या विषयावर ते सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेचा शेवट माजी पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या व्याख्यानाने होणार आहे. सोमवार १६ सप्टेंबर रोजी श्री. उपाध्याय ताणतणाव व मानसिक स्वास्थ्य या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या व्याख्यानमालेस गणेशभक्तांनी उपस्थित रहावे आणि मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी याप्रसंगी केले.

या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, तज्ञ संचालक ॲड. प्रदीपसिंह राजपूत, संचालक जगदीश भुतडा, पुरुषोत्तम उडता, आनंद कुलकर्णी, संचालिका चंद्रिका चौहान, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य डॉ. अजितकुमार देशपांडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, कर्ज विभाग प्रमुख आनंद ताशी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार, उपाध्यक्षा प्रीती चौहान, सचिव नामदेव यलगोंडा, खजिनदार सुहास कमलापुरकर, व्याख्यानमाला समिती प्रमुख मदन मोरे, सुहास मुळजकर तसेच मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: janta banksolapurSolapur Maharashtra
Previous Post

सन्मानवीर ॲड.राजपूत यांचा बार असोसिएशनच्या वतीने गौरव

Next Post

Pune:महादेव कोगनुरे यांच्या सुशीलकुमार शिंदे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा..

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post

Pune:महादेव कोगनुरे यांच्या सुशीलकुमार शिंदे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.