Sunday, June 29, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना…

MH 13 News by MH 13 News
9 September 2024
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना…
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन

नवी दिल्ली, ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदन आज दुमदुमले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी  एकच गर्दी केली . गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय  वातावरण संपूर्ण दिल्ली व  राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात आज  गणरायाची  प्रतिष्ठापना करण्यात आली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात  महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व  कर्मचारी, गणेशभक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी, आज सकाळी येथील कोपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ या घोषणा, ढोल ताशांचा गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. मिरवणुकीनंतर शासकीय पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३८ मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.

गणेशोत्सव काळात कार्यक्रमांची रेलचेल

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान करण्यात  आले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी  गणेशभक्तही गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभागी होतात.

Previous Post

सिंधी साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान …

Next Post

राज्यात सव्वा दोन वर्षांत ३.१४ लाख कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक

Related Posts

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
Next Post
राज्यात सव्वा दोन वर्षांत ३.१४ लाख कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक

राज्यात सव्वा दोन वर्षांत ३.१४ लाख कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.